Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयपरवानगी दिली नाही तरी 2 सप्टेंबरपासून मशिदी उघडणार

परवानगी दिली नाही तरी 2 सप्टेंबरपासून मशिदी उघडणार

मुंबई | Mumbai –

करोना संकटामुळे राज्यातील प्रार्थनास्थळं बंद आहेत. इतर गोष्टींवरील निर्बंध कमी होत असताना प्रार्थनास्थळं पुन्हा उघडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी वारंवार होत आहे.

- Advertisement -

दरम्यान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारने विरोध केला तरी 2 सप्टेंबरपासून राज्यातील मशिदी उघडणार असल्याचं म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

आम्ही आमच्यावतीने अल्टिमेटम देत आहोत. 1 तारखेला गणपती विसर्जन आहे. हिंदू बांधवांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. 1 तारखेपासून सगळी मंदिरं उघडा आणि 2 तारखेपासून आम्ही आमच्या सगळ्या मशिदी उघडणार. काही योग्य तर्क असतील तर ऐकू अन्यथा परवानगी दिली नाही तरी 2 तारखेपासून सर्व मशिदी उघडू हे सरकारमधील लोकांना मला सांगायचं आहे, असं आव्हानच इम्तियाज जलील यांनी दिलं आहे. यावेळी त्यांनी याची सुरुवात आपणच औरंगाबादमधून करणार असल्याचंही सांगितलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या