कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : वैजापुरात महाविकास आघाडी, युतीचे पॅनल रिंगणात

jalgaon-digital
4 Min Read

वैजापूर | प्रतिनिधी

वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यातील महाविकास आघाडीतील ठाकरेसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिंदेसेना व भारतीय जनता पक्षाच्यावतीने जो फाॅर्म्युला राज्यात आहे तोच फाॅर्म्युला बाजार समितीच्या निवडणुकीत वापरला जाणार आहे.

राज्य पातळीवरील नेत्यांनी तसे फर्मानही नेत्यांना सोडले आहे. संबंधित पक्षाच्या स्थानिक नेत्यांचीही तशी सहमती दर्शविल्याने हाच फाॅर्म्युला राबविला जाणार असल्याच्या वृत्तास दुजोरा त्यांनी दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी व शिंदेसेना व भाजप पुरस्कृत पॅनलच्या उमेदवारांमध्ये सरळ – सरळ लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु असे असले तरी जागावाटपाबाबत कोणत्याही पक्षात एकमत नसल्याने चर्चेचे गु-हाळ अजून सुरूच आहे.

इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव! विहीर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, आत्तापर्यंत ३५ जणांनी गमावला जीव

वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या 18 जागांसाठी 28 एप्रिल रोजी पंचवार्षिक निवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये मॅरेथॉन बैठका सुरू आहे. शिंदेसेनेसह, भाजप व महाविकास आघाडीतील ठाकरेसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस नेत्यांची मित्रपक्षांशी जागावाटपाबाबत बोलणी सुरू असून अद्याप अंतिम चित्र स्पष्ट झाले नाही. परंतु स्थानिक नेत्यांनी पक्षातील इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. जागावाटपात प्रत्येक पक्षनेता आपल्या वाट्याला जास्त जागा कशा येतील? हाच प्रयत्न करीत आहेत. शिंदेसेना व भाजप नेत्यांची काही निवडक कार्यकर्त्यांची यासंदर्भात प्राथमिक बोलणी झाली आहे. याशिवाय ठाकरेसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस नेत्यांमध्येही आघाडीबाबत बोलणी सुरू आहे. या नेत्यांचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला असता राज्यात जो आघाडी व युतीचा फाॅर्म्युला आहे. तोच फाॅर्म्युला या निवडणुकीत राहील.

“नथुराम गोडसेने गांधींबाबत जे केले ते…”; कालीचरण महाराज पुन्हा बरळले

किंबहुना तसे फर्मानच वरिष्ठ नेत्यांनी सोडलेले आहे. त्यामुळे कुठेही पळण्याचा प्रश्नच येत नाही. असे सूतोवाचही त्यांनी केले. भाजपमधील दुसर्‍या फळीतील काही कार्यकर्ते शिंदेसेनेसोबत युती करण्यासाठी अनुत्सुक असले तरी हा विरोध फार काळ टिकणार नाही. त्यांचा हा विरोध केवळ ‘पेल्यातील’ वादळ ठरणार आहे. त्यामुळे आघाडी व युतीबाबतचा नागरिकांचा संभ्रम दूर झाला आहे.

अप्पासाहेब पाटील निवडणूक आखाड्यात

यंदाच्या निवडणुकीत शिंदेसेना व भाजप युतीच्या चमूत काँग्रेसचे माजी खासदार स्व. रामकृष्णबाबा पाटील यांचे पुत्र तथा जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब पाटील हेही दाखल होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्याच्या राजकारणाच्या आखाड्यात त्यांनी उडी घेतली आहे.

दुबईला जाणाऱ्या विमानाला पक्षाची धडक, दिल्लीत इमर्जन्सी लँडिंग

राज्यात शिंदेसेना व भाजप युतीचा जो फाॅर्म्युला आहे. त्यानुसारच ही निवडणूक लढविली जाणार आहे. तसा पक्षादेशही आहे. त्यामुळे अन्य कुणासोबत जाण्याचा प्रश्नच नाही.

रमेश बोरनारे (आमदार, शिंदेसेना, वैजापूर)

महाविकास आघाडीतील नेत्यांशी आघाडीबाबत बोलणी सुरू आहे. जागावाटपाबाबत अजूनही एकमत नाही. परंतु आघाडी होईल. असे मलाही वाटते.

भाऊसाहेब पाटील चिकटगावकर (माजी आमदार, ठाकरेसेना, वैजापूर)

अभय चिकटगावकरांचा BRS मध्ये प्रवेश; तिसऱ्यांदा केले पक्षांतर

निवडणुकीबाबत शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्यासोबत प्राथमिक बैठक होऊन बोलणी झाली. प्रदेश पातळीवरील जशी युती आहे. तेच समीकरण या निवडणुकीत राहणार असून तसे आदेशच वरिष्ठांचे आहे.

डॉ. दिनेश परदेशी (माजी नगराध्यक्ष, भाजप, वैजापूर)

आघाडीतील नेत्यांशी चर्चा सुरू असून राज्यातील फाॅर्म्युलाच या निवडणुकीत राहील. तसे आदेश पक्षातील नेत्यांनी दिले आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना इच्छुकांना दिल्या आहेत.

भाऊसाहेब ठोंबरे (नेते, राष्ट्रवादी काँग्रेस, वैजापूर)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *