Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यासावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राडा, तोडफोड, घोषणाबाजी.., काय आहे प्रकार?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राडा, तोडफोड, घोषणाबाजी.., काय आहे प्रकार?

पुणे | Pune

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) एका अश्लील रॅप साँगचे शूटींग केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला. विद्यापीठातील मुख्य इमारतीतच हे अश्लील रॅप साँग शूट केल्यामुळे या प्रकारामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद(अभाविप) ने आक्रमक पावित्रा घेत आंदोलन छेडले…

- Advertisement -

शुभम जाधव (Shubham Jadhav) नावाच्या मुलाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रॅप साँग शूट केलं होतं. या रॅप साँगसाठी विद्यापीठातील काही कर्मचाऱ्यांनीच तोंडी परवानगी दिल्याची माहिती त्याने दिली होती. यामुळे समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

कुलगुरुंच्या (Chancellor) अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या या बैठकीला सिनेटचे सदस्यही उपस्थित होते. बैठक सुरू असतानाच अचानक घोषणाबाजीचा आवाज आला. काही कळायच्या आत अभाविपच्या कार्यकर्त्यांचा मोठा समूह बैठकीच्या ठिकाणी शिरला. कुलगुरुंशी कोणतीही चर्चा न करता या आंदोलकांनी तोडफोड करण्यास सुरुवात केली. खिडक्यांच्या काचा फोडल्या.

IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्स-सनरायझर्स हैदराबाद आज आमनेसामने; कशी आहे खेळपट्टी? जाणून घ्या

दरवाजाच्या काचा फोडल्या. कागद फाडून तेही उधळले. ही तोडफोड करत असताना आंदोलक जोरदार घोषणाबाजी देत होते असे सांगण्यात येते. अश्लील गाण्याचं चित्रीकरण करण्यास परवानगी दिल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे विद्यापीठात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, अभाविपचे (ABVP) कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते. त्यामुळे सिनेट सदस्यांनी हस्तक्षेप करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण हे आंदोलक सिनेट सदस्यांचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. काहींनी तर बैठकीच्या ठिकाणीच ठिय्या मांडून जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे आणखीनच गोंधळ वाढला. विशेष म्हणजे बैठकीच्या ठिकाणी पाच ते सहा सुरक्षा रक्षक होते. पण त्यांनी या आंदोलकांना अडवलं नाही. या सुरक्षा रक्षकांनी कुलगुरूंच्या भोवती कडं घातलं होतं.

Happy Birthday Sachin : …अन् सचिन क्रिकेटचा देव बनला!

तोडफोड केली नाही असे आंदोलकांच्या वतीने सांगण्यात येते…

विद्यापीठात अश्लील गाण्याचं चित्रीकरण होतेच कसे? ज्यांनी हे गाणं चित्रीकरण करण्यास परवानगी दिली त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या आंदोलकांनी यावेळी केली. आम्ही संवैधानिक मार्गाने आंदोलन करत आहोत, आम्ही कोणतीही तोडफोड केली नाही. अश्लील गाण्याचं चित्रीकरण झालं. त्यावर कारवाई झालेली नाही. कुलगुरू त्याच ठिकाणी बसले आहेत. पण कारवाई करत नाही. त्यामुळेच आम्ही आंदोलन पुकारलं आहे, असं एका आंदोलकाने सांगितलं.

काय म्हणाले कुलगुरू ?

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. त्या समितीची बैठक सुरू आहे. संध्याकाळपर्यंत ते काही अनुमान काढतील. आज पहिली बैठक आहे. एक दोन बैठकीनंतर कारवाईबाबतचा निर्णय होईल, असं कुलगुरुंनी यावेळी सांगितले आहे.

गुन्हा दाखल मात्र…

या रॅप साँग शुट प्रकरणी चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) शुभमवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, अद्याप त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही; तसेच आता विद्यापीठात रॅप साँग शुटींगला कुणी परवानगी दिली? त्याच्यांवरही कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात नेमका दोष कुणाचा? हे विद्यापीठाने नेमलेल्या उच्चस्तरीय चौकशी समितीने अहवाल दिल्यानंतरच समोर येणार आहे. दरम्यानच्या काळात झालेल्या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता, बऱ्याच वेळाने वातावरण निवळले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या