Thursday, April 25, 2024
Homeनगर‘अगस्ती’ची निवडणूक धनशक्ती विरुद्ध सामान्यशक्ती - पिचड

‘अगस्ती’ची निवडणूक धनशक्ती विरुद्ध सामान्यशक्ती – पिचड

अकोले |प्रतिनिधी| Akole

अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक धनशक्ती विरूद्ध सामान्यशक्ती अशी झाली. अनितीने मिळविलेला विजय हा संपूर्ण अकोले तालुक्याने पाहीला. यामध्ये सर्वसामान्य शेतकरी सभासद व माझे प्रामाणिक कार्यकर्ते माझ्यासोबत राहीले. आमच्यावर जो विश्वास दाखविला, नुसत्या अवाहनावर आमच्या पदरात जे मतदान टाकले ते अमुल्य आहे असे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

शेतकरी विकास मंडळाच्या वतीने काढलेल्या या पत्रकात पुढे म्हटले की, अगस्तीच्या संपूर्ण निवडणुकीत पैशाची उधळपट्टी पाहीली, मतांचा बाजार मांडला, आमच्या सर्वसामान्य उमेदवारांना हे सर्व न परवडणारे होते. बोगस मतदानाचा लावलेला सपाटा व अर्थपूर्ण सबंधातून मते विकत घेतली. आमच्या शेतकरी विकास मंडळाचे उमेदवार अत्यंत प्रामाणिक शेतकरी कुटूंबातील होते. तर समोर आमच्याशी प्रतारणा करणारे धनाढ्य लोक यांच्यासमोर आमचा तो काय ठाव लागणार! हे प्रामाणिकपणे सांगितले पाहीजे.

बोगस व मयतांचे मतदान त्यांनी घडवून आणले हे संपूर्ण तालुक्याने पाहीले असाच प्रकार संपूर्ण मतदान केंद्रांवर झाला. पैशाने सर्व यंत्रणा ताव्यात घेतली असा प्रकार अकोल्याच्या इतिहासात प्रथमच झाला. ही अनितीची निवडणूक सभासद शेतकरी यांना न मानवणारी आहे. भविष्य काळातही अगस्ती टिकला पाहीजे, शेतकरी जगला पाहीजे ही आमची भुमिका असेल, असेही या पत्रकात म्हटले आहे. पत्रकावर माजी आमदार वैभव पिचड, माणिक देशमुख, रामनाथ वाकचौरे, संदीप शेटे, भाऊसाहेब खरात, प्रकाश नवले, सुधाकर आरोटे, सुनिल कोटकर, किसन शेटे, राजेंद्र देशमुख, रावसाहेब शेळके, बाळासाहेब सावंत, जालिंदर वाकचौरे, भाऊसाहेब वाकचौरे, नामदेव उगले, रंजना नाईकवाडी, आरती मालुंजकर, बाळासाहेब वडजे, सुभाष काकड यांच्या स्वाक्षरी आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या