अहमदनगर|Ahmedagar
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडात पसार असलेला बाळ बोठे विरोधात नगर शहरातील एका विवाहित महिलेने कोतवाली
- Advertisement -
पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खूनासह विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने बोठे समोरील अडचणी वाढल्या आहेत.
बोठे याने राहत्या घरी येऊन माझ्या पतीला कामानिमित्त बाहेर पाठवुन माझ्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचे तसेच मी पुणे येथे गेल्यानंतर मला फोन करून अश्लील शब्द वापरून माझ्यात व सासूमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला असल्याचे पिडीतीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. रेखा जरे यांच्या हत्याकांडात बोठे याचे नाव आल्यापासून तो पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. त्याच्यावर खूनानंतर आता विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.