Friday, May 10, 2024
Homeनगरकरोना रूग्णाचा मृत्यू ; रूग्णालयाची तोडफोड

करोना रूग्णाचा मृत्यू ; रूग्णालयाची तोडफोड

अहमदनगर|Ahmedagar

ऑक्सिजन व रेमडेसिवीर न मिळाल्याने करोना रूग्णांचे हाल होत आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांचा जीव जात आहे. आज सकाळी जिल्हा रूग्णालयात एका करोना रुग्णाचा मृत्यू झाला. संतप्त झालेल्या रूग्णाच्या नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात गोंधळ घातला. रूग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या काचांची तोडफोड केली.

- Advertisement -

अचानक झालेल्या या घटनेने जिल्हा रूग्णालयात गोंधळाचे वातावरण होते. दरम्यान घटनास्थळी तत्काळ तोफखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला.

नगर तालुक्यातील एका करोना संसर्ग रूग्णावर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत होते. आज सकाळी या रुग्णाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्याने आणि ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्ण दगावला, असा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला. रुग्णाच्या नातेवाईकांनी यावरून चांगलाच गोंधळ घातला. यातील एकाने अतिदक्षता विभागाच्या काचा फोडल्या. या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. तोफखाना पोलीस जिल्हा रुग्णालयात दाखल झाले असून तोडफोडीचा पंचनामा करत आहे. जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी फिर्याद दिल्यानंतर संबंधितावर गुन्हा दाखल केला जाईल असे तोफखाना पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या