Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशG20 Summit : आफ्रिकन युनियनला मिळालं स्थायी सदस्यत्व!

G20 Summit : आफ्रिकन युनियनला मिळालं स्थायी सदस्यत्व!

नवी दिल्ली | New Delhi

दिल्लीमध्ये सध्या जी-२० परिषदेची (G-20 Summit) मोठी बैठक सुरू आहे. या बैठकीची सुरुवात करतानाच एक मोठी घोषणा करण्यात आली. आफ्रिकन महासंघाला (African Union gets G-20 Membership) G-२० राष्ट्रांमध्ये स्थायी सदस्यत्व देण्यात आले असल्याचे पंतप्रधान मोदींनी जाहीर केले. यानंतर आफ्रिकन संघाचे अध्यक्ष अझाली असोउमानी यांचे सर्वांनी स्वागत केले. त्यामुळे आता यापुढे G-20 नव्हे तर G-21 म्हटले जाईल.

- Advertisement -

किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढल्या; ईडीकडून लवकरच होणार चौकशी?

आफ्रिकन महासंघाला जी-20 देशांचे स्थायी सदस्यत्व मिळावे यासाठी पंतप्रधानांनी सर्व सदस्य देशांसमोर प्रस्ताव ठेवला होता. याला सर्वांनुमते सहमती मिळाल्यानंतर PM मोदींनी आपल्याजवळील ‘गॅवल’ तीन वेळा वाजवून आफ्रिकन संघाच्या अध्यक्षांना पुढे आमंत्रित केले.

पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर परराष्ट्र मंंत्री जयशंकर यांनी आफ्रिकन युनियनच्या अध्यक्षांना आपल्या नवीन स्थानापर्यंत पोहोचवले. याठिकाणी पंतप्रधान मोदींनी मिठी मारुन त्यांचे स्वागत आणि अभिनंदन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. ते म्हणाले की, अडीच हजार वर्षांपूर्वी भारताने जगला संदेश दिला होता. ‘मानवतेचं कल्याण व सुख नेहमीच सुनिश्चित केलं जायला हवं’ या संदेशाला आठवून जी-20 परिषदेला सुरुवात करुयात. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची ही वेळ आहे. कोरोना महामारीवेळी जगावर मोठे संकट आले होते, त्यावेळी विश्वासाचा अभाव असल्याचे जाणवले. पण अविश्वासाला आता विश्वासाने जिंकायचे आहे.

Morocco Earthquake : शक्तिशाली भूकंपाने मोरोक्को हादरले! 296 हून आधिक ठार, इमारती कोसळल्या

आपण कोरोनाला हरवू शकतो, तर अविश्वासाच्या संकटालाही हरवू शकतो, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. सर्वांनी मिळून ग्लोबल ट्रस्ट डेफिसिटला विश्वासात बदलूयात. सर्वांना सोबत घेऊन चालायची ही वेळ आहे. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास हा मंत्र आपल्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतो. भारताचे G-20 अध्यक्षपद हे देशामध्ये आणि देशाबाहेर सर्वसमावेशाच्या सबका साथचे प्रतीक बनले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या