सचिन तेंडुलकरांच्या ‘या’ कृत्यावर बच्चू कडूंचा थेट आक्षेप; लिहिलं खुलं पत्र

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | Mumbai

अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी भारतातील लोकप्रिय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्या एका गोष्टीवर थेट आक्षेप घेतला आहे. या गोष्टीसंदर्भात अनेक तक्रारीही येत असून लवकरात लवकर ती बंद करावी, असं खुलं पत्र राज्य सरकारला (Maharashtra government) दिल्याचं ट्विटही बच्चू कडू यांनी केलं आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, भारतरत्न सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) सध्या पेटीएम फस्ट या ऑनलाईन गेमची जाहीरात करताना दिसत आहे. या जाहीरातीवरुन प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहले आहे. या पत्रामध्ये ऑनलाईन जुगाराच्या जाहिरातीतून लोकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळेच सचिन तेंडुलकर यांनी जनतेचा विचार करून अश्या प्रकारच्या जाहिराती करू नये.. अशी मागणी त्यांनी आपल्या पत्रामधून केली आहे.

Accident News : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच, भरधाव खासगी बस ट्रकला धडकली
अजित पवारांच्या बंडावर उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “आधी पक्ष फोडला जायचा, आता…”

बच्चू कडूंनी पत्रात काय म्हंटलंय?

पेटीएम फर्स्ट गेम या जुगाराची जाहिरात भारतरत्न सचिन तेंडुलकर करीत आहेत. तेंडुलकर हे प्रसिद्ध माजी क्रिकेटर आहेत . भारतात त्यांचे लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत चाहते आहेत. त्यामुळे ते करत असलेल्या जाहीरातींचा परिणाम लहान, थोर अशा सर्व स्तरांपर्यंत होतो. अशा जुगाराच्या जाहिरातीला महाराष्ट्रातील जनता बळी पडत आहे. अनेकांचं कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त देखील होत आहे. अशा प्रकारच्या तक्रारी बऱ्याच जणांकडून माझ्यापर्यंत प्राप्त झाल्या आहेत. यासाठी त्यांनी आझाद मैदानात आंदोलनही केलेलं आहे. पेटीएम फर्स्ट गेम या ऑनलाईन जुगारावर भारतातील आंध्रप्रदेश, आसाम, नागालँड, सिक्कीम, अरुणाचलप्रदेश, मेघालय, ओडीसा, तेलंगणा या आठ राज्यांमध्ये पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. भारतरत्न सन्मानानं सन्मानीत झालेल्या व्यक्तीनं अशा प्रकाराच्या जुगाराची जाहिरात करणं लोकांच्या हिताचं नाही. त्यामुळे भारतरत्ननं सन्मानित असलेल्या सचिन तेंडुलकर यांनी भारतातील जनतेचा विचार करून अशा प्रकारच्या जाहिराती करू नयेत ही देशवासियांसाठी त्यांची नैतिक जबाबदारी आहे. महाराष्ट्रातील नव्हेच तर भारताची पुढील पिढी या जुगाराच्या विळख्यातून वाचवायची असेल तर या जाहिरातीवर बंदी घालण्यात यावी आणि लोकांची व त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक फसवणूक थांबविण्यात यावी, ही विनंती!

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *