Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर

राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर

नाशिक | Nashik

आता अखेर यंदा राज्यात ११ ऑक्टोबर दिवशी एमपीएससीची परीक्षा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज एमपीएससी कडून प्रवेश पत्र म्हणजेच अ‍ॅडमीट कार्ड्स ऑनलाईन जारी करण्यात आली आहे.

- Advertisement -

उमेदवारांना एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावरून mpsc.gov.in किंवा mahampsc.mahaonline.gov.in वरून ही अ‍ॅडमीट कार्ड्स डाऊनलोड करता येणार आहेत.

राज्यात करोना व्हायरस संकटाचा धूमाकूळ पाहता यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे तीन- तेरा वाजले आहेत. यामध्ये राज्यातील स्पर्धा परीक्षा देखील अपवाद नाहीत.

करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेतल्या जाणार्‍या परीक्षांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आले होते.

असे करा डाऊनलोड

mpsc.gov.in किंवा mahampsc.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट दया.

तुमच्या परीक्षेच्या नावासह (PSC State Service Prelims Exam 2020) अ‍ॅडमीट कार्ड्सची लिंक पहा.

लॉग ईन करण्यासाठी एक नवी विंडो तुमच्या स्क्रीनवर ओपन होईल त्यावर ‘My Account Section’ पर्यायावर क्लिक करा.

Competitive Exam हा टॅब ओपन करून यंदाच्या वर्षाचं अ‍ॅडमीट कार्ड ओपन करा.

- Advertisment -

ताज्या बातम्या