Thursday, April 25, 2024
Homeनाशिकव्हेंटिलेटर दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग

व्हेंटिलेटर दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग

नाशिकरोड । प्रतिनिधी

गेल्या महिन्याभरापूर्वी पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटर बिटको व डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलसाठी आले होते. अद्याप हे व्हेंटिलेटर धूळ खात पडून आहे. प्रसारमाध्यमांनी याबाबत आवाज उठवला होता. मंगळवारी बिटको कोविड केंद्रात शॉर्टकट्समुळे काही व्हेंटिलेटर बंद पडले होते. या घटनेमुळे मनपा प्रशासनाला जाग आली असून पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटरबाबत मनपाने केंद्राकडे धाव घेतली आहे.

- Advertisement -

सध्या नाशिकरोड बिटको कोविड रुग्णालय विविध घटनांनी वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. शनिवारी बिटको कोविड रुग्णालयात रेमडिसीव्हर, ऑक्सिजन, इतर गोष्टी अभावी योग्य उपचार मिळत नसल्याने भाजपच्या विद्यमान नगरसेविका सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र ताजणे यांनी चारचाकी हॉस्पिटलमध्ये घुसवत तोडफोड केली होती.

तर मंगळवारी सायंकाळी पुन्हा येथील कोविड सेंटरमधील अतिदक्षता विभागात एका व्हेंटिलेटरमधून अचानक धूर आल्याने अजून चार व्हेंटिलेटर बंद पडले. मात्र व्हेंटिलेटरील रुग्णांना दुसरीकडे हलवल्यामुळे सुदैवाने ते वाचवले. या प्रकारानंतर मनपाला जाग आली आहे. बिटको रुग्णालयात 45 व डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमधील 15 असे 60 व्हेंटिलेटरबाबत चौकशी सुरू केली. तसेच व्हेंटिलेटर बरोबरच सुटे भाग का आले नाही. कंपनी सुटे भाग देण्यास असर्मथा दाखत आहे का, म्हणून मनपाने आता केंद्राकडे धाव घेतली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या