Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्र60 दिवस उलटूनही केंद्र सरकारने शेतकर्‍यांची दखल घेतली नाही- आदित्य ठाकरे

60 दिवस उलटूनही केंद्र सरकारने शेतकर्‍यांची दखल घेतली नाही- आदित्य ठाकरे

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रमधील शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले. तसेच या शेतकरी आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेतल्याचे सांगितले.

- Advertisement -

या शेतकरी आंदोलनात शिवसेना नेत्यांचा सहभाग नसल्याबाबतची टीका होत आहे. या विषयी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारले असता, किसान मोर्चाकडे कोणी फिरकले की नाही, हा विचार करण्यापेक्षा केंद्र सरकारने शेतकरी आंदोलनाची किती दखल घेतली याकडे आपल्याला लक्ष केंद्रीत करायला हवे असे ठाकरे म्हणाले.

आज 60 दिवस झाले, तरी देखील केंद्र सरकारने शेतकर्‍यांची दखल घेतलेली नाही. असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कल्याण-डोंबिवली येथील पत्री पुलाच्या उद्घाटनानंतर बोलत होते.

दिल्लीला सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हजारोच्या संख्येने महाराष्ट्रमधील शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले. तिथून मोर्चा राजभवनाकडे जात असताना मेट्रो सिनेमा चौकात अडवला गेला. त्यानंतर राज्यपाल मुंबईत नसल्याची माहिती मोर्चेकर्‍यांना मिळाली.

राज्यपाल स्वत: वेळ देऊनही उपस्थित नसल्याने संयुक्त मोर्चा चांगलाच आक्रमक झाला. राज्यपालांच्या या कृतीचा निषेध करत संयुक्त मोर्चाच्या वतीनं राजभवनावर जाण्याचा निर्णय रद्द करत राज्यपालांना देण्यात येणारे निवेदन फाडून टाकण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या