आडगाव येथे स्टेट बँक आयोजित शेतकरी मेळावा उत्साहात

आडगाव |वार्ताहर| Aradgav

भारतीय स्टेट बँकेच्या लोणी शाखेच्या वतीने राहाता तालुक्यातील आडगाव बुद्रूक ग्रामपंचायत कार्यालयात शेतकरी मेळावा उत्साहात पार पडला. लोणी शाखेचे सरव्यवस्थापक सुनिल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली असिस्टंट मॅनेजर प्रमोद डाके व कृषी सहयोगी संदीप शिरसाठ यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करून शेतीविषयक मिळणार्‍या कर्जासंदर्भात माहीती दिली.

अध्यक्षस्थानी सरपंच सौ. पुनम बर्डे होत्या. यावेळी उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना प्रमोद डाके यांनी पिक कर्ज, सोतारण कर्ज तसेच डेअरी फार्मीग अंतर्गत दुधाळ गायी संगोपनासाठी बॅकेकडून शेतकर्‍यांसाठी दिल्या जाणार्‍या कर्जाची माहिती दिली. तसेच बँकेकडून कमीत कमी व्याजदरात शेतकर्‍यांसाठी असलेल्या योजना समजावून सांगितल्या. जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कृषी सहयोगी संदिप शिरसाठ यांनी पिक कर्ज, पशुपालन, सोनेतारण आदी योजनांसाठी कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्रांबाबत शेतकर्‍यांना माहिती दिली. प्रास्तविक ग्रामसेवक देवेंद्र वारूळे यांनी केले.

यावेळी उपसरपंच अशोक लहामगे, सदस्य भिमराज शेळके, वसंतराव शेळके, सचिन शेळके, प्रविण शेळके, संजय शेळके, सी. एम. शेळके, किशोर वराडे, दत्तात्रय शेळके, पत्रकार नानासाहेब शेळके, शिवाजी जाधव, सिताराम शेळके, शिवाजी शेळके, गोरक्षनाथ शेळके, सुनिल बर्डे, मंजिराम शेळके, पंढरीनाथ शेळके, सुनिल शेळके, संजय शेळके, सुभाष शेळके, रामदास लहामगे, भिकाजी शेळके, सारंगधर लहामगे, ग्राहक सेवा केंद्राचे गोविंद उदावंत, भाऊसाहेब लहामगे, चंद्रभान वराडे, प्रकाश वराडे, मारूती लहामगे, अर्जुन लहामगे, दीपक साळवे, संतोष वराडे, आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरपंच व उपसरपंच यांनी गावच्यावतीने बँकेच्या अधिकार्‍यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आभार सी.एम. शेळके यांनी मानले. शेतकरी मेळावा यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी राजेश शेळके, सुभाष बर्डे, अशोक बोधक यांनी विशेष परीश्रम घेतले.