Tuesday, April 23, 2024
Homeनगरआडगावच्या सुपूत्राने शोधले मोस्ट वाँन्टेड दहशतवाद्यांचे कनेक्शन

आडगावच्या सुपूत्राने शोधले मोस्ट वाँन्टेड दहशतवाद्यांचे कनेक्शन

राहाता (तालुका प्रतिनिधी)

राजस्थान मधील जयपूर साखळी बाँम्ब स्फोटातील दहशतवाद्यांच्या तपासात तालुक्यातील आडगाव खुर्दचे मंगेश शेळके या पोलिस अंमलदाराने महत्वाची भुमिका बजावली.

- Advertisement -

पुण्याच्या कोथरुड पोलिस ठाण्याच्या हद्दीत 18 जुलै 2023 रोजी पोलिस शिपाई अमोल नजन व प्रदिप चव्हाण हे रात्री गस्तीवर असताने पहाटे चार ते पाच च्या दरम्यान तिघे संशयीत इसम दुचाकी चोरीचा प्रयत्न करत असतांना त्यांना आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते संशयीत उडवा उडवीचे उत्तरे देवू लागली. त्यांची झडती घेतली असता कटर, कटवणी असे घरफोडीसाठी वापरात येणारे साहित्य आढळून आले. दोघा पोलिसांनी तात्काळ आजुबाजूच्या पोलिस ठाण्यात संपर्क करुन मार्शलला मदतीसाठी बोलविले. व त्या संशयितांना अधिक चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. व तेथुन कोथरुड पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यांच्याकडील चार मोबाईल, एक लॅपटॉप जप्त करण्यात आला. हे सर्व साहित्य कोथरुड पोलिस ठाण्याच्या तपास यंत्रणेकडे सोपविण्यात आले. तपास यंत्रणेतील पोलिस अंमलदार अंमलदार मंगेश शेळके यांनी सदर मोबाईल, लॅपटॉपचे सखोल पृथ्थकरण केले असता त्यामध्ये दहशतवादी सदृश्य साहित्य आढळून आले. त्यावरुन ही माहिती श्री. शेळके यांनी आपल्या वरिष्ठ अधिकार्‍याना कळविली.

यात अधिक तपासात सदरचे तीनही दहशतवादी एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) च्या मोस्टवाँन्टेड लिस्ट होते. त्यांच्यावर 25-25 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. आडगावच्या या सुपूत्राने या दहशतवाद्याची खरी ओळख समोर आणली. राहाता तालुक्यातून या सुपूत्राचे अभिनंदन होत आहे. मंगेश शेळके हे सन 2000 ते 2017 पर्यंत भारतीय लष्कारात होते. तेथे ते वायुरक्षा प्रणालित कार्यरत होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी पुणे शहर पोलिस दलात प्रशिक्षणानंतर रुजू झाले. ते 2017 पासून पुण्याच्या कोथरुड पोलिस ठाण्यात सेवेत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या