मोदी-अदानींविरूद्ध काँग्रेसची घोषणाबाजी

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर | Ahmednagar

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचे (Chatrapati Shivaji Maharaj International Airport) नाव बदलून अदाणी एअरपोर्ट (Adani Airport) केल्याच्या प्रकरणाची नगर (Ahmednagar) शहरामध्ये प्रतिक्रिया उमटली आहे.

करोना अपडेट : आज जिल्ह्यात किती नवे रुग्ण? कोणत्या तालुक्यात किती?

शहर काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांनी इम्पेरियल चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याला हार घालून काँग्रेस कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, मोदी सरकार मुर्दाबाद, अदाणी उद्योगपती मुर्दाबाद, अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. यावेळी मोदी, अदाणी (Gautam Adani) यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन काँग्रेस कार्यकर्त्यांनी केले.

मुंबईतील सांताक्रुझ येथील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचे व्यवस्थापन जेव्हीके कंपनीकडून जुलै महिन्यांमध्ये अदाणी कंपनीकडे आले आहे.अदाणी कंपनीने सुमारे 74 टक्के भाग यातील घेतला आहे. अदाणी कंपनीने व्यवस्थापनाचा ताबा घेताच विमानतळ परिसरामध्ये असणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोरच अदाणी एअरपोर्ट असे फलक लावले होते. हे फलक मुंबईत आंदोलकांनी उखडून काढले. याचे तीव्र पडसाद नगर शहरात देखील उमटले आहेत.

‘समृद्धी महामार्गा’च्या बांधकाम कंपनीचे गेट आंदोलकांनी केले बंद

शहर जिल्हा काँग्रेसने या प्रकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असल्याचे म्हणत महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वोच्च स्थानी असून केंद्रातील मोदी सरकार आणि मोदी सरकारच्या आशीर्वादाने अदाणी उद्योगपतीने केलेला हा किळसवाणा प्रकार घृणास्पद असल्याचे म्हटले आहे.

यावेळी मनोज गुंदेचा, खलील सय्यद, अनंतराव गारदे, प्रवीण गीते पाटील, अक्षय कुलट, सुजित जगताप, वीरेंद्र ठोंबरे, ऋतिक लद्दे, शंकर आव्हाड, गणेश आपरे, मोहनराव वाखुरे, डॉ. हनीफ शेख, उषाताई भगत, सुमन कालापहाड, कौसर खान,मयूर घोरपडे, वैभव कांबळे, सागर दळवी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *