Tuesday, April 23, 2024
Homeनगरविकास रंगमंचावरील महामेरू हरपला - उदगीरकर

विकास रंगमंचावरील महामेरू हरपला – उदगीरकर

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचा सामाजिक कार्याचा संघर्ष आणि विकासाचा प्रवास थक्क करणारा असून आम्हा सिने अभिनेत्यांना त्यांची प्रत्येक कृती शिकवण देणारी आहे. त्यांच्या निधनाने विकासाच्या रंगमंचावरील महामेरु हरपला अशा शब्दांत मराठी सिनेअभिनेते चिन्मय उदगीरकर यांनी श्रद्धांजली वाहिली.

- Advertisement -

मंगळवारी मराठी सिने अभिनेते श्री चिन्मय उदगीरकर व त्यांच्या सहकार्‍यांनी कोल्हे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सिंधुताई कोल्हे, नाशिक मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सरचिटणीस निलीमा वसंतराव पवार, बंधू दत्तात्रय कोल्हे, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, डॉ. मिलींद कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीट्यूटचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे, सुमित कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, प्रणव वसंतराव पवार, वेदांग मिलींद कोल्हे, ईशान बिपिन कोल्हे, डॉ. प्राची वसंतराव पवार, अमृता वसंतराव पवार, गोदावरी नदी स्वच्छता अभियानाचे आदिनाथ ढाकणे आदी उपस्थित होते.

चिन्मय उदगीरकर म्हणाले की, कलावंत अभिनयाने समृद्ध होतो, पण समाजकारणातून राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍या शंकरराव कोल्हे यांनी वयाच्या 21 व्या वर्षांपासून हाती घेतलेले विकासाचे व्रत 93 वर्षांपर्यंत अविरतपणे सुरू ठेवले. त्यातून त्यांची प्रत्येक कृती आम्हा सर्वांसाठी एक प्रेरणा देणारी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या