Friday, April 26, 2024
Homeजळगावशौचालय घोटाळ्यातील लेखाधिकारी पोलिसांच्या जाळ्यात

शौचालय घोटाळ्यातील लेखाधिकारी पोलिसांच्या जाळ्यात

रावेर| Raver प्रतिनिधी-

रावेर पंचायत समितीत (Raver Panchayat Samiti) झालेल्या टॉयलेट घोटाळ्याने (toilet scam) संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.यातील मुख्य आरोपी (main accused) अद्याप फरार (Absconding) असून त्यांचे साथीदार असलेल्या ६ आरोपींना पोलिसांनी अटक (arrested 6 accused.) केली आहे. यात पंचायत समितीचे लेखाधिकारी (Accounts Officer) लक्ष्मण पाटील (Laxman Patil, A) यांचा समावेश असून,गुरुवारी या आरोपींना रावेर न्यायालयात हजर केले असता दि.१२ जुलै पर्यंत पोलीस कोठडी (Police cell) सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

अडीच महिन्याआधी पंचायत समितीतील शौचालय घोटाळा चव्हाट्यावर आला.यात गट समन्वयक समाधान निंभोरे व समूह समन्वयक मंजुश्री पवार यांच्यासह अनेक वेळा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.तेव्हा पासून हे दोन्ही आरोपी फरार आहे.त्यांना या गुन्ह्यात सहकार्य करणारे पंचायत समितीचे लेखाधिकारी लक्ष्मण पाटील,विवरे खुर्द येथील उपसरपंच बाबुराव पाटील,रवींद्र रायपुरे,नजीर तडवी,रुबाब तडवी,हमीद तडवी यांना बुधवारी पोलिसांनी अटक केली होती.

गुरुवारी त्यांना सपोनि शीतलकुमार नाईक यांनी रावेर न्यायलयात हजर केले असता दि.१२ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.जिल्ह्यात नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात हा घोटाळा चर्चेत आला आहे.यातील मुख्य आरोपी अडीच महिन्यापासून फरार असल्याने, यातील सामील असलेल्या अन्य आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

आणखी आरोपींची संख्या वाढणार

रावेर पंचायत समितीत झालेल्या शौचलाय घोटाळ्यात अनेक मोठे मासे देखील सामील असल्याची चर्चा आहे.आता लक्ष्मण पाटील यांना अटक केल्यानंतर, अनेकांच्या पाचावर धार बसली आहे.सहा आरोपी पोलिसांनी ताब्याताब्यात घेतले असून,आणखी काही आरोपी वाढतील असे सुतोवाच तपास अधिकारी शीतलकुमार नाईक यांनी दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या