Wednesday, April 24, 2024
Homeनगरसमग्र शिक्षाचे खाते आत्ता महाराष्ट्र बँकेत, शाळांसमोर समस्यांचा पाढा

समग्र शिक्षाचे खाते आत्ता महाराष्ट्र बँकेत, शाळांसमोर समस्यांचा पाढा

संगमनेर |वार्ताहर| Sangamner

राज्यातील गटसाधन केंद्र, केंद्र स्तरीय साधन केंद्र, शाळा व्यवस्थापन समिती यांच्या नावाने समग्र शिक्षा योजनेसाठी बँक ऑफ महाराष्ट्र येथे खाते उघडणे संदर्भात राज्य प्रकल्प संचालक यांनी आदेश दिले आहेत. मात्र जिल्ह्यात बँक ऑफ महाराष्ट्राच्या अत्यंत कमी शाखा असल्याने शिक्षकांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

- Advertisement -

राज्यातील महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने शाळा, केंद्र व गटसाधन केंद्र यांना वेगवेगळ्या योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येतो. सदरचा निधी राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने उपलब्ध करून देते येत असल्याने महाराष्ट्र शिक्षण परिषद यांनी बँक ऑफ महाराष्ट्र येथे खाते उघडण्यास संदर्भात आदेशित केले आहे. सदरच्या बँकेत खाते न उघडल्यास संबंधितांना अनुदान उपलब्ध करून देण्यात अडचण येणार आहे. त्यामुळे संबंधित शाळांनी खाते न उघडल्यास अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. मात्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखांचे प्रमाण अत्यंत अल्प आहेत अशा परिस्थितीत संबंधित तालुक्यातील सर्व शाळांनी एका शाखेत खाते उघडणे शिक्षकांसाठी अडचणीचे ठरणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील या आहेत शाखा

अहमदनगर कॅम्प, शहर, अकोले, अकोलनेर, नेप्ती, अस्तगाव, बाभळेश्वर, बेलापूर, आंबोरा, बुर्‍हानगर, चापडगाव, चिंचपूर, चितळी रोड, चितळी, दहेगाव बोलका, गुंजाळवाडी दशमेशनगर, हंगेवाडी, हिवरे बाजार, जामखेड, जातेगाव, जवळा, जेऊर, कर्जत, वडगाव कोकमठाण, कोपरगाव, कुकाने, माहिजळगाव, माले वडगाव, मिरजगाव, नागापूर, नारायण गव्हाण, नेवासा, पारनेर, पाथर्डी, पुणतांबा, राहुरी, राजूर, राळेगण-सिद्धी, संगमनेर, सावेडी, अहमदनगर, शेवगाव, शिर्डी, श्रीगोंदा, श्रीरामपूर, सोनई, वांबोरी, टाकळीभान, वाकडी, वाकडी फाटा, येसगाव, वरुर या ठिकाणी जिल्ह्यातील सुमारे 56 शाखा अस्तित्वात आहेत.

तालुक्यात सरासरी तीन शाखा

अहमदनगर जिल्ह्यात 14 तालुके व एक महानगरपालिकेचा अस्तित्व आहे. त्यातील सर्वाधिक शाखा नगर शहराच्या जवळ आहेत. संगमनेर तालुक्यात संगमनेर व गुंजाळवाडी, अकोले तालुक्यात अकोले व राजुर अशा शाखा आहेत. अकोले तालुक्यातील दोन शाखा आणि सुमारे 400 शाळा जिल्हा परिषदेच्या व माध्यमिक शाळा यांचा विचार करतात शिक्षकांना बँकेशी व्यवहार करणे अडचणीचे ठरणार आहेत. शाळेचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी बँकेत प्रत्यक्ष जाणे आवश्यक असते. अशावेळी संबंधित शिक्षकांचा पूर्ण दिवस वाया जाण्याची शक्यता आहे. बँकेशी व्यवहार करताना शिक्षकाचा वर्गातील अध्यापनासाठी चा एक दिवस वाया जाईल. अनेक शाळांमध्ये महिला शिक्षकांकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार आहे. प्रवासासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर ती अवलंबून राहावे लागते. त्यांच्या दृष्टीने देखील गैरसोय होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्याची अनुमती द्यावी अशी मागणी शिक्षक वर्गाकडून करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या