Friday, April 26, 2024
Homeजळगावशिवीगाळ लागता जिव्हारी, सोपान जाई यमसदनी

शिवीगाळ लागता जिव्हारी, सोपान जाई यमसदनी

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

फायनान्सचे हफ्ते (Finance instalment) थकीत असलेली दुचाकी (bike) खळ्यात लपवून ठेवलेली होती. ही दुचाकीचा मित्रांकडून परस्पर वापर केला जात होता. त्याचा राग आल्याने दुचाकी वापरणार्‍या मित्रांना (friends इतरांसमोर सोपान हटकरने शिविगाळ केली. हे त्याच्या मित्रांच्या जिव्हारी लागल्याने चौघांनी त्यांच्याकडे असलेल्या चॉपर (Chopper) सोपानच्या छातीत भोसकून त्याचा निर्घृण खून (Atrocious murder) केल्याची घटना रविवारी रात्री गोलाणी मार्केटमध्ये घडली होती. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या चार तासातच एलसीबीच्या पथकाने चौघ संशयितांच्या त्यांच्या घरुन मुसक्या आवळल्या.

- Advertisement -

शहरातील हरिविठठल नगरात सोपान हटकर हा आई सोबत वास्तव्यास होता. सोपान हा सेंट्रींग तसेच मिळेल ते मजुरी काम करुन तो उदरनिर्वाह करत होता, तर त्याची आई धुणीभांडीचे काम करुन उदरनिर्वाहात हातभार लावत होती. सोपानने काही दिवसांपूर्वी फायनान्स वर हप्त्याने दुचाकी घेतली आहे. दुचाकीचे काही हप्ते थकल्याने शोरुम कंपनीवाले ही दुचाकी घेवून जातील या भितीने सोपान याने त्याची दुचाकी रिंगणगाव येथे असलेल्या त्याच्या मामांच्या शेतातील खळ्यात लपवून ठेवली होती. परंतु गुढीपाडव्याच्या दिवशी सोपानचे मित्र गोविंदा झांबरे व ज्ञानेश्वर लोंढे हे दोघ परस्पर जावून त्यांनी रिंगणगाव येथे लपविलेली दुचाकी घेवून आले आणि तिचा वापर करत होते. ही बाब सोपानच्या लक्षात आल्याने त्याला प्रचंड राग आला होता.

अवघ्या चार तासात मारेकरी जेरबंद

गुन्हा घडल्यानंतर अवघ्या चार तासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपाासचक्रे फिरवित संशयित गोविंदा शांतीलाल झांबरे उर्फ चेरी (वय-22,रा.नाथवाडा), ज्ञानेश्वर दयारा लोंढे उर्फ नानू (वय-21, रा. कंजरवाडा), राहुल भरत भट (वय- 20, रा. शालीनीनगर, खोटेनगर) व करण सुभाष सकट (वय- 20, रा. बी.जे.मार्केटजवळ) या चौघांना जेरबंद केले.

अन् एलसीबीने फिरविले तपासचक्र

घटनेची माहिती मिळाल्यानंतर एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, गणेश चौभे, पोहेकॉ विजयसिंग पाटील, राजेश मेंढे, संजय हिवरकर, कमलाकर बागुल, सुधाकर अंभोरे, अशरफ शेख, संदीप पाटील, महेश महाजन, अकरम शेख, संदीप साबळे, पोना संतोष मायकल, विजय पाटील, प्रवीण मांडोळे, दर्शन ढाकणे, ईश्वर पाटील, लोकेश माळी यांचे तीन पथके संशयितांचा शोध घेण्यासाठी रवाना केले. संशयितांचे धागेदोरे मिळताच संशयितांना त्यांच्या घरुन ताब्यात घेतले.

दुचाकी घ्यायला बोलविले अन् वेळ साधली

रविवारी रात्री दोघांनी दुचाकी वापरणार्‍या गोविंदा व ज्ञानेश्वर यांनी सोपान याला दुचाकी घेण्यासाठी गोलाणी मार्केटमध्ये बोलविले. गोलाणीत आल्यावर सोपानने दोघांना शिवीगाळ केेली. त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद उफाळून आल्याने चौघांनी सोपानला मारहाण करण्यास सुरुवात केली. ठिकाणी गोविंदा, ज्ञानेश्वर यांच्यासह राहूल भरत भट व करण सकट हे उभे होते.

मात्र, सोपान हा मद्याच्या नशेत शिवीगाळ करू लागल्यामुळे वाद उफाळून आला. नंतर ज्ञानेश्वर याने त्याच्यावर चॉपरने वार करून खून केला. तसेच इतरांनीही चॉपरने वार करत त्याला संपविल्याची कबुली संशयितांनी पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रागविल्यानंतरही घेवून गेले दुचाकी

सोपानने त्याच्या मित्रांना तुम्ही दुचाकी का घेवून आले म्हणत रागविले होते. पण, त्यानंतरही रविवारी दुपारी गोविंदा व ज्ञानेश्वर हे दोघेही सोपान याची दुचाकी घेवून पारोळा येथे लग्नाला गेले होते. ही बाब सोपानला माहित झाल्यावर त्याने फोन करुन माझी दुचाकी घेवून या म्हणत दोघांना जळगावला बोलावले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या