Friday, April 26, 2024
Homeनगर13 वर्षांपासून पसार असलेल्या आरोपींना अटक

13 वर्षांपासून पसार असलेल्या आरोपींना अटक

अहमदनगर (प्रतिनिधी) –

जबरी चोरी व दंग्याच्या गुन्ह्यात मागील 13 वर्षांपासून पसार असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद

- Advertisement -

केले आहे. अदिक्या उर्फ आदेश अदिक, शिवटीन्या काळे (वय 45 रा. देऊळगाव गलांडे ता. श्रीगोंदा), प्रकाश दत्तू गोलवड (वय 40 रा. भिंगाण ता. श्रीगोंदा) असे जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत.

सन 2007 मध्ये अदिक्या काळे याच्याविरूद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. तर सन 2008 मध्ये प्रकाश गोलवड विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दंग्याचा गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल झाल्यापासून हे दोघे आरोपी पसार झाले होते. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अनेक वर्षांपासून पसार असलेल्या आरोपींचा शोध घेण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला सूचना केल्या आहेत.

पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी त्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त केले आहे. तांत्रिक तपास व गुप्त खबर्‍यामार्फत आरोपी त्यांच्या राहत्याघरी आले असल्याची माहिती निरीक्षक कटके यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस हवालदार बबन मखरे, पोलीस नाईक शंकर चौधरी, पोलीस शिपाई प्रकाश वाघ, सागर ससाणे यांच्या पथकाने आरोपींना अटक केली आहे. पुढील तपासकामी आरोपींना श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या