Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedVideo : आषाढी एकादशीनिमित्त संगीत मैफल

Video : आषाढी एकादशीनिमित्त संगीत मैफल

नाशिक | प्रतिनिधी

दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त प्रेक्षकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणीच असते. गेली २ वर्ष कोरोना महामारीमुळे आपण सगळेच प्रत्यक्ष कार्यक्रमांपासून वंचित आहोत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वैभवाचा आविष्कार असलेली पंढरीची वारीही ऑनलाइन पध्दतीने होत आहे.

- Advertisement -

ऑनलाइन पद्धतीने विठ्ठलाचरणी आणि रसिक प्रेक्षकांसाठी कार्यक्रम सादर करावा अशी अनेकांची इच्छा होती. या विचारातूनच आषाढी एकादशीनिमित्त तेजस कंसारा आणि वैभव काळे यांच्या संकल्पनेतून सिद्धकला वाद्यवृंद प्रस्तुत ”अभंगवाणी…

कार्यक्रमाचे निवेदन बागेश्री पारनेरकर यांनी केले असून व्हायोलिन वर तुषार दुबे, हार्मोनियम ऋतुजा वाणी, बासरी विधान बैरागी, कीबोर्ड किरण सानप, तबला तेजस कंसारा, तबला वैभव काळे, पखवाज देवेंद्र दानी, तालवाद्य सागर मोरस्कर हे होते. तांत्रिक बाजू ध्वनी योगेश कापडी,दृश्य संकलन मयूर कंसारा,छायाचित्रण संकेत बर्वे, छायाचित्रण संकलन नित्या कंसारा, ध्वनी संकलन आदित्य नेरे यांनी सांभाळली.

रसिकांनी या संपूर्ण कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, अशी विनंती कलाकारांनी केली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीेतेसाठी तुषार सोनवणे , अनुप शिंदे यांचे सहकार्य लाभले.

- Advertisment -

ताज्या बातम्या