Friday, April 26, 2024
Homeजळगावदुचाकीच्या अपघातात नवविवाहितेचा मृत्यू

दुचाकीच्या अपघातात नवविवाहितेचा मृत्यू

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील पातोंडा गावा जवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती घसरुन, या अपघातात (accident) दुचाकीवरील नवविवाहितेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पती गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. हि घटना आज (दि,२९) पहाटे ५ वाजेच्या दरम्यान घडली असून याप्रकरणी अज्ञात चाळीसगाव पोलीसात (police) कुठल्याही प्रकारची नोंद नाही.

- Advertisement -

पातोंडा येथील गुरूमाऊली हार्डवेअरचे मालक उमेश रोकडे व त्याची पत्नी प्रियंका रोकडे हे दोघही काही कामानिमित्त नाशिकला जाण्यासाठी आज सकाळी ५ वा घरून मोटार सायकलने पातोंडा येथून चाळीसगाव रेल्वे स्टेशन जाण्यासाठी निघाले असता, पातोंडा गावा जवळून अवघ्या एक किलोमिटर अतंरावर चाळीसगव-भडगाव रोडवर समोरुन अचानक भरधाव वेगाने येणार्‍या अज्ञात वाहनाच्या प्रकाश झोझात उमेश यांचेे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने, दुचाकी रस्त्याच्या खाली पडली. यात दुचाकीवरून पडून प्रियंकाचा डोक्याला दगडाचा मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर उमेश यांनाही जबर मार लागल्याने ते बेशूध्द अवस्तेत होते. थोडी शुध्द आल्यावर त्याने घरी फोन लावला आणि घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबातील सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि मयत आणि जखमीला रुग्णालयात दाखल केले. उमेश व प्रियंका यांच्या नुकताच विवाह झाला होता. लग्नाला पाच ते सहा महिने झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातात नववधुचा मृत्यू झाल्यामुळे पातोंडा गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीसात दुपारपर्यंत कुठल्याही प्रकारची नोंद नव्हती.

- Advertisment -

ताज्या बातम्या