Friday, April 26, 2024
Homeनाशिकदोन दिवसीय सैन्याच्या शस्त्रांच्या प्रदर्शनाचा समारोप

दोन दिवसीय सैन्याच्या शस्त्रांच्या प्रदर्शनाचा समारोप

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) व युनायटेड वी फाउंडेशन (United We Foundation) व तोफखाना केंद्राच्या (Artillery Center) वतीने नाशकातील गोल्फ क्लब मैदान येथे दोन दिवसीय शस्त्रांच्या प्रदर्शनाचा (Display of weapons) उत्साहात समारोप करण्यात आला.

- Advertisement -

भारतीय सैन्य दल (Indian Army) किती शक्तिशाली आहे याची नाशिककरांनी दोन दिवसांत अनुभूती घेतली. यावेळी नाशिककर आपल्या कुटुंबीयांसह प्रदर्शन बघायला आले होते. सैन्य दलातील जवानांसोबत सेल्फी काढण्याचा मोह नाशिककरांना आवरला गेला नाही. यावेळी सैन्य दलातील जवानांनी देखील प्रत्येक शस्त्राबद्दल माहिती देत आपले सैन्य दल किती शक्तिशाली आहे याचा नाशिककरांना अनुभव दिला.

यावेळी प्रत्येक जण जवानांना भेटल्यावर जय हिंद सर हे वाक्य आवर्जून उच्चारतांना दिसला. यावेळी सैन्य दलाने (military force) विविध प्रात्यक्षिके सादर करत आपल्या अफाट शक्तीचा परिचय नाशिककरांना करून दिला.

अश्वदलाचे प्रमुख सुभेदार गौरव मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली तुफान, शायनिंग स्टार, मॅक्स, साहिबा या चार प्रशिक्षित सैनिकी अश्वांच्या सहाय्याने हवालदार प्रधान चौधरी, राजकुमार, नायक दिलीपकुमार, लान्स नायक अमोल सानप यांनी प्रात्यक्षिके सादर केली. सुभेदार कैलास दळवी यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या चमूने जीम्नेक्स्टिक ची प्रात्यक्षिके सादर केली.

या प्रदर्शनात बोफोर्स (Bofors), आधुनिक धनूष, हलकी होवित्झर (Light howitzer) (एम-७७७), इंडियन फिल्ड सॉल्टम (Indian Field Saltam) (१५५ एम.एम), हलकी तोफ (light cannon) (१०५एमएम), उखळी तोफ (१३० एम.एम), मोर्टार (१२० एम.एम), मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर (Multi barrel rocket launcher) (बीएम२१), लोरोस रडार सिस्टीमसह (Loros Radar System) तब्बल १९ तोफांसह बघण्याची नाशिकरांना संधी उपलब्ध झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या