Friday, April 26, 2024
Homeनाशिकबिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षात 10 जणांचा मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षात 10 जणांचा मृत्यू

नाशिक । प्रतिनिधी

इगतपूरीच्या काननवाडी भागात तीन वर्षीय बालिकेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घट्ना घड्ली. मागील काही कालावधीपासून बिबट्याकडून मानवीवस्तीवरील हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. दीड वर्षात बिबटयाच्या हल्ल्यात दहा जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे दहा मृतांमध्ये सहा बालकांचा सामावेश आहे.

- Advertisement -

पश्चिम विभागातील नाशिक वनक्षेत्रामध्ये चार आणि इगतपूरी वनक्षेत्रात सहा अशा एकुण दहा जणांंचा बिबट्याच्या हल्ल्यात दुदैवी मृत्यू झाला आहे. हिंगणवेढा येथील बारा वर्षीय मुलगा सकाळच्या वेळी रनींगला जात असताना, उसात लपलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप टाकून ओढ्त नेले, यात त्याचा मृत्यू झाला. विशेष या घटनेपासूनच बिबट्याकडून लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. बुधवारी काननवाडी येथील बिबट्याच्या हल्यात बालिका मृत झाल्याची दहावी घटना होती.

जिल्ह्यातील गोदागाठ व दारणा किनारी भागातील गावांमध्ये बिबट्यांचा संचार दिसून येत असतो. नाशिक वनक्षेत्रात तीन चार दिवसांपूर्वी विल्होळी व देवळाली कॅम्पच्या विजयनगर भागात बिबट्यांचा संचार दिसून आला. दरम्यान बिबट्याने बालकांबरोबर चार ज्येष्ठ नागरिकांवर हल्ला करुन ठार केले, लहान मुले व ज्येष्ठ नागरिक प्रतिकार करु शकत नसल्यानचे या दोन गटांना लक्ष्य केले जात आहे.

उसाचे शेत लपण्यासाठी सोपे असल्याने बिबट्यासाठी हेच अधिवासाचे ठिकाण होऊ पाहत आहे. दोन वर्षापासून बिबट्याच्या संचारामुळे नाशिक वनक्षेत्रांमधील दोनवाडे, नानेगांव, शिंदे, पळसे, बाबळेश्वर, चाडेगाव, हिंगणवेढे, लोहशिंगवे, भगुर, देवळाली कॅम्प ही गावे तर इगतपूरी वनक्षेत्राच्या चिंचलाखैरा, कुरुगवाडी, खैरगांव, अधरवड, पिंपळ्गांव भोर, काननवाडी हा भाग कायम धगधगत असतो. कुठेही बिबट्या दिसला तर तत्काळ वनविभागाला माहिती द्या, त्याचा पाठ्लाग करु नका, आरडाओरड करु नका, असे आवाहन वनविभागाने केले आहेे.

या गावातील व्यक्तींचा झाला मृत्यू

हिगणवेढे बारा वर्षीय मुलगा, दोनवाडे शिवारात बालक व वृद्ध व्यक्ती, चिचंलाखैरा ज्येष्ठ महिला, बाभळेश्वर बालक, कुरुगवाडी ज्येष्ठ व्यक्ती, खैरगाव ज्येष्ठ व्यक्ती, पिपळ्गांवभोर बालिका, अधरवड् बालिका, काननवाडी बालिका

नागरिकांनी रात्रीच्या वेळी लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांची काळ्जी घ्यावी, घराबाहेर लाइट लावावा, सायंकाळच्या वेळी गाणे वाजवावीत आवाजाने बिबट्या दूर जातो, सुक्या मिरच्यांचा धूर केल्यास तरीही बिबटया त्या परिसरातून निघून जातो.

– महेंद्रकुमार पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी, इगतपूरी वनक्षेत्र

- Advertisment -

ताज्या बातम्या