देवळाली कॅम्प | वार्ताहर | deolali camp
तालुक्यातील भगूर (Bhagur), देवळाली कॅम्प जवळील वंजारवाडी गावात पावसामुळे घर कोसळून पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वंजारवाडी गावातील लालवाडी या आदिवासी वस्तीतील गवारे यांचे घर पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान पावसामुळे कोसळले.
यात पती-पत्नीचा मृत्यू झाला असून मुले बचावली आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस व तहसीलदार हे घटनास्थळी पोहचले.
चार दिवसांपूर्वी गावात ढगफुटी झाली होती. विरोधी पक्षनेतेसह लोकप्रतिनिधी यांनी या गावात भेट दिली होती. त्यानंतर या गावात पुन्हा दुर्दैवी घटना घडली आहे.