Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यायात्रेकरूंना घेऊन जाणारी व्हॅन ४० फूट खोल दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू

यात्रेकरूंना घेऊन जाणारी व्हॅन ४० फूट खोल दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली | New Delhi| वृत्तसंस्था

केरळ-तामिळनाडू सीमेजवळील (Kerala-Tamil Nadu border) कुमिलीजवळ सबरीमाला यात्रेकरूंना (Sabarimala pilgrims) घेऊन जाणारी व्हॅन उलटल्याने भीषण अपघात झाला असून अपघातात आठ यात्रेकरूंचा मृत्यू तर दोन प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत…

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला आहे. हे सर्व शबरीमाला श्री धर्म संस्था मंदिरात भगवान अय्यप्पाचे दर्शन घेऊन परतत होते. त्यावेळी कुमिली-कुंबम मार्गावर (Kumili-Kumbam Route) तामिळनाडूला पाणी वाहून नेणाऱ्या पहिल्या पेनस्टॉक पाईपजवळ व्हॅन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने व्हॅन रस्त्यापासून सुमारे ४० फूट खाली कोसळल्याने हा अपघात (Accident) घडला.

दरम्यान, अपघातात मृत्यू (Death) पावलेले सर्व यात्रेकरू मुळचे थेनी-अँडीपेट्टीचे रहिवासी असल्याचे समजते. तसेच केंद्रीय परराष्ट्र आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही मुरलीधरन (Minister of State V Muraleedharan) यांनी या दुर्घटनेत आपले जवळचे आणि प्रियजन गमावलेल्या कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या