Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेश7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महागाई भत्त्यात घसघशीत वाढ

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महागाई भत्त्यात घसघशीत वाढ

दिल्ली | Delhi

गेल्या काही महिन्यांपासून थकबाकीसह महागाई भत्ता (Dearness Allowance) वाढीच्या प्रतिक्षेत असलेल्या लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Government employees) केंद्र सरकारने आज मोठी भेट दिली.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक (Union Cabinet meeting) झाली. या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्याच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या १ वर्षात तीनदा महागाई भत्त्याला (DA) ब्रेक लागला होता. परंतु आता १ जुलैपासून सामान्य महागाई भत्ता मिळणार आहे. म्हणजेच आतापर्यंत केंद्रीय कर्मचार्‍यांना १७ टक्के मिळणारा महागाई भत्ता आता ११ टक्क्यांनी वाढून थेट २८ टक्के होणार आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळं केंद्रीय कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारी लोकांना लाभ होणार आहे. देशात कोरोनाचा प्रकोप सुरु झाल्यानंतर अर्थव्यवस्थेवरील वाढता ताण पाहता महागाई भत्ते वाढवण्यावर निर्बंध आणले होते. मागील वर्षी कोरोना महामारी सुरु झाल्यानंतर एप्रिल महिन्यात केंद्रीय कॅबिनेचनं सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता दोन हफ्त्यात देण्यावर बंदी आणली होती. महागाई भत्त्याचे हफ्ते प्रत्येक सहा महिन्याला दिले जातात. १ जानेवारीला एक तर दुसरा १ जुलैला हा हफ्ता सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जातो.

काय असतो महागाई भत्ता ?

वाढत्या महागाईमुळे सर्वच वस्तुंच्या किंमती वाढतात. लोकांच्या हातात असलेला पैशाचे मूल्य कमी होते. यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जातो.

- Advertisment -

ताज्या बातम्या