Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशगोव्यात विक्रमी मतदान; राजकीय पक्षांची धाकधूक वाढली

गोव्यात विक्रमी मतदान; राजकीय पक्षांची धाकधूक वाढली

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly elections) दुसर्‍या टप्प्यात आज उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), गोवा (Goa) आणि उत्तराखंड (Uttarakhand) या तीन राज्यांमध्ये मतदान पार पडले….

- Advertisement -

उत्तर प्रदेशातील 55 जागांसाठी आणि गोव्यातील 40 आणि उत्तराखंडमधील 70 जागांसाठी मतदान झाले. या तिन्ही राज्यांत सत्ता राखण्याचे भाजपसमोर (BJP) आव्हान आह़े.

संध्याकाळी 5 वाजेपर्यंत गोवा विधानसभा निवडणुकीत 75.29 टक्के इतके विक्रमी मतदान झाले आहे. गोवा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात 301 उमेदवार रिंगणात होते.उत्तर प्रदेशमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत 60.44 टक्के मतदान झाले होते. उत्तराखंड येथे 59.37 टक्के मतदान झालेले होते.

गोव्यात याआधी दुरंगी लढत होत होती़ मात्र, यंदा सत्ताधारी भाजप आणि मुख्य प्रतिस्पर्धी काँग्रेसबरोबरच (Congress) आम आदमी पक्ष (AAP) आणि तृणमूल काँग्रेस पक्ष रिंगणात उतरलेला आह़े.

रासबिहारी-मेरी लिंक रोडवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

गोव्यात तृणमूल काँग्रेस आणि मगोप या पक्षांची युती आह़े शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनीही निवडणूकपूर्व आघाडी जाहीर केली आहे, तर आम आदमी पक्ष स्वबळावर लढत आह़े.

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी यावेळी बंपर 75 टक्कयांवर मतदान झाल्याने आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांची चिंता वाढली आहे. निवडणुकीत कुठल्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही, असा अंदाज गोव्यातील काही नेत्यांनी व्यक्त केला आहे.

साडे तीन लोकांच्या अटकेसाठी उद्धव ठाकरे मुहूर्त शोधत होते का?; किरीट सोमय्यांचा टोला

यामुळे निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी मुख्य सामना हा काँग्रेस आणि भाजपमध्ये होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे राजकीय पक्षांनी निवडणूक निकालानंतर युती आणि आघाडीची तयारी सुरू केल्याचे बोलले जात आहे. गोव्यासह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल हा 10 मार्चला लागणार आहे. आता त्यावेळी अधिक चित्र स्पष्ट होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या