Wednesday, April 24, 2024
Homeधुळेगोराणे येथे रिक्षाचालकाकडे 72 हजारांची घरफोडी

गोराणे येथे रिक्षाचालकाकडे 72 हजारांची घरफोडी

धुळे । प्रतिनिधी Dhule

शिंदखेडा तालु्नयातील गोराणे येथे रिक्षा चालकाकडे घरफोडी करून चोरट्यांनी रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा एकुण 72 हजारांचा ऐवज लंपास केला. काल सकाळी ही घटना उघडकीस आली.

- Advertisement -

याबाबत रिक्षा चालक गौतम हिरालाल आखाडे (वय 41 रा. पंचशील नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर गोराणे ता. शिंदखेडा) यांनी नरडाणा पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी दि. 19 रोजी सायंकाळी 5 ते दि. 21 फेबु्रवारी रोजी 7 वाजेदरम्यान घराच्या दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. कपाटातील लॉकरमधील रोख 50 हजार रूपये, 8 हजारांचे चार ग्रॅमचे सोन्याचे कानातील काप, 6 हजारांचे 3 ग्रॅमच सोन्याचे टॉप्स व 8 रूपये किंमतीचे 4 ग्रॅमचे सोन्याचे मणी असा एकुण 72 हजारांचा ऐवज चोरून नेला. त्यानुसार नरडाणा पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोना बागूल करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या