Wednesday, May 8, 2024
Homeजळगावसंत मुक्ताबाई डिजिटल वारीत 50 लाख भाविक

संत मुक्ताबाई डिजिटल वारीत 50 लाख भाविक

संत मुक्ताईच्या पादुका परतीच्या प्रवासाला

मुक्ताईनगर – प्रतिनिधी Muktainagar

- Advertisement -

महाराष्ट्रातील मानाच्या पालखी सोहळ्यातील तापीतीर ते भीमातीर श्रीसंत मुक्ताबाई पालखी सोहळा श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर ते श्रीक्षेत्र पंढरपूर 311 वर्षाचे प्रदिर्घ परंपरेने जात असतो. यावेळी कराना संसर्गजन्य रोगांपासून संरक्षणासाठी शासनाने पायी वारीने न जाता वाहनाद्वारा करण्यात आला. प्रस्थानापासून आगमनापर्यत संपूर्ण पालखी सोहळ्याचे कार्यक्रम सोशल मीडियाचे माध्यमातून दररोज लाईव्ह प्रसारणात सहभागी होत 50 लाखावर भाविकांनी डीजीटल वारी अनुभव घेतला.

संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे दि.27 मे रोजी प्रस्थानापासुन ते 24 जुलै पालखी आगमनापर्यत श्री संत मुक्ताबाई पादूकांचे नित्यपूजा अभिषेक आरती, नैवैद्य, प्रवचन, कीर्तन, भजन, भारूड आदी परंपरेच्या सेवांना युट्युब चॅनल व फेसबुकवर लाईव्ह प्रसारण केले गेले.

या लाईव्ह डीजीटल वारीचा लाभ दररोज जगभरातील हजारो भाविक घेत होते. दररोजच्या कीर्तन प्रवचनात मुक्ताबाई फडावरील अनेक कीर्तनकारांनी सेवा दिली. वारीचे कालखंडात संपूर्ण 58 दिवसांत 50 लाखापेक्षाही जास्त भाविकांनी घरबसल्या वारीचा अनुभव घेतला.

यावर्षी सर्वात जास्त मुक्ताबाई पालखी सोहळा सोशल मिडियात अग्रस्थानी राहीला. सोशल मीडिया टिमचे सम्राट पाटील, महंत नितीनदास महाराज, उध्दव महाराज जुनारे, ज्ञानेश्वर हरणे, गणेश अढाव यांचे विशेष सहकार्य लाभले. भाविकांनी मुक्ताई संस्थान सोशल मीडियाला दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल अध्यक्ष रविंद्र पाटील व पालखी सोहळा प्रमुख हभप. रविंद्र महाराज हरणे यांनी नेटकरी भाविकांचे आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या