Wednesday, April 24, 2024
Homeजळगावपोलीस प्रशासनाकडून तीन दिवसात 5 लाखांचा दंड वसूल

पोलीस प्रशासनाकडून तीन दिवसात 5 लाखांचा दंड वसूल

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

कोरोना नियंत्रणासाठी एकीकडे जिल्हा प्रशासन विविध उपाययोजनांच्या माध्यमातून तर रस्त्यावर अहोरात्र उभे राहून पोलीस दल कोरोनासाठी नियंत्रणासाठी अहोरात्र झटत आहे तर दुसरीकडे सर्वाच्यांच सुरक्षेसाठी राबविण्यात येत असलेले नियम मोडून मोठ्या प्रमाणावर नागरिक बेपर्वाईचे दर्शन घडवित असल्याचेे पोलीस दलाने तीन दिवसात केलेल्या कारवाईच्या आकडेवारीवरुन समोर आले आहे.

- Advertisement -

दि. 24 ते 26 मे दरम्यान या तीन दिवसात जिल्हाभरात विनामास्कच्या दोन हजार तर विनाकारण फिरणार्‍या 475 जणांवर दंडात्मक कारवाईसह कलम 188 अन्वये 96 गुन्हे दाखल केले आहेत. अवघ्या तीन दिवसांच्या कारवाईतून 5 लाख 27 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली आहे.

नागरिकांची बेपर्वाही रस्त्यावर

जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत कोरोना नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शासन आदेशानुसार बे्रक द चैन अंतर्गत कडक निर्बंध घोषित केले आहेत. यात सकाळी 7 ते 11 दरम्यान अत्यावश्याक सेवांना परवानगी देण्यात आली आहे. इतर व्यवसाय बंदचे आदेश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाईचे आदेशही जिल्हाधिकार्‍यांची केले आहे. याच पार्श्वभूमिवर नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचा दंडुका उगारण्यात येत आहे.

नियम मोडणार्‍यांवर कारवाईसाठी जिल्ह्यात विविध ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात 24 ते 26 मे दरम्यान या तीन दिवसात जिल्ह्यात विनामास्क फिरणार्‍या एकूण 2 हजार जणांवर तर विनाकारण फिरणार्‍या 475 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात येवून 5 लाख 27 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यात ठिकठिकाणी असे एकूण 96 गुन्हेही कलम 188 अन्वये दाखल करण्यात आले असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले. नागरिकांनी नियमांचे पालन करुन पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी यावेळी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या