४९वी महाराष्ट्र राज्य ज्यूदो स्पर्धा : नाशिकच्या वैभवी नाईकला सुवर्णपदक

jalgaon-digital
5 Min Read

नाशिक | प्रतिनिधी Nashik

पुनित बालन गृप ( Punit Balan Group )यांच्या सहयोगाने आयोजित ४९ व्या महाराष्ट्र राज्य ज्यूदो स्पर्धेमध्ये ( 49th Maharashtra State Judo Tournament) महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा प्रभोधीनी संघाने सर्वात जास्त गुण मिळवून या स्पर्धेचे सर्व साधारण विजेतेपद आपल्या नांवें केले. तर कोल्हापूरच्या खेळाडूंनीही चांगली कामगिरी करून आपल्या संघाला उपविजेटपद प्राप्त करून दिले.

आजच्या दुसऱ्या दिवशी सबज्युनियर्स १५ वर्षाखालीच्या मुलींच्या ३२ किलो वजनगटात नाशिकच्या वैभवी नाईकने अत्यंत आक्रमकपणे खेळी करत यवतमाळच्या राष्ट्रीय रौप्यपदक विजेत्या आयेशाला नमवत सुवर्णपदक पटकावले. नुकत्याच दिल्ली येथे खेलो इंडिया अंतर्गत आयोजित राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेत यवतमाळच्या आयेशा शेखने रौप्यपदक पटकावले होते. त्यामुळे तिचा आत्मविश्वास चांगला होता. परंतु नाशिकच्या वैभवीने याचे दडपण न घेता आपली रणनीती आखली.

सामन्याच्या सुरवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत प्रारंभी स्वीप या डावाने वैभवीने अर्धा गुण घेत आघाडी मिळविली. त्यानंतरच्या दोन मिनिटामध्ये तीने तोमाइनागे या तिच्या आवडीच्या डावाचा अवलंब करून अर्धा गुण घेऊन विजय संपादन केला. याआधी खेळल्या गेलेल्या गटवार साखळीमध्ये या दोन्हीही खेळाडूंनी आपापल्या गटामध्ये अत्यंत कमी वेळात सर्व प्रतिस्पर्ध्यांवर पूर्ण गुणाने मात करून दबदबा निर्माण केला होता. त्यामुळे अंतिम लढतीत प्रेक्षकांचे आकर्षण ठरलेल्या या गटात वैभवीने आयेशाला संधी न देता सुंदर खेळ करून सुवर्णपदक पटकावले.

दरम्यान धुळे संघानेही प्रस्थापित जिल्ह्यांच्या वर्चस्वाला धक्का देत सुवर्णासह तीन पदकांची मोठी कमाई केली. यामध्ये ३५ किलो गटात धुळ्याच्या हिमांशु पगारेने क्रीडा प्रबोधिनी संघाच्या आर्यन शेंडेला धूळ चाखली आणि स्वत:चे सर्वोच्च स्थान सिद्ध केले. याचप्रमाणे ३६ किलो मुलींच्या गटात धुळ्याच्या काजल येरगेनेही चांगला खेळ करून अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. परंतु अंतिम लढतीत तीला यवतमाळच्या समृद्धी कपिल कडून हार पत्करावी लागल्याने तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मुलांच्या ६६ किलो गटात योग हेमाडेने कांस्यपदक मिळवले. यावर्षी प्रथमच सहभागी झालेल्या जालना संघातील साक्षी बोरगांवकरने आपल्या पदार्पणातच २८ किलो गटात कांस्यपदक मिळवून आपली चुणूक दाखवली.

जिल्हा क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनद्वारा आयोजित आणि धुळे जिल्हा ज्यूदो अमॅच्युयर असोसिएशन यांच्या सहयोगाने ४९ व्या सबज्युनियर्स आणि कॅडेट स्पर्धेचा आजच्या दुसर्‍या दिवशी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन केले. यावेळी सुनील चौधरी, संजय पवार, तुषार पाटील, विश्वास पाटील, पराग अहिरे, सर्फराज अन्सारी, फादर ब्रिजोराजन आणि क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांच्यासह महाराष्ट्र ज्यूदो संघटनेचे महासचिव शैलेश टिळक, अध्यक्ष अँडव्होकेट धनंजय भोसले, रवी पाटील, दत्ता आफळे, रवी मेटकर, सतीश पहाडे, गणेश शेटकर, विकास पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण बागूल यांनी तर आभार प्रदर्शन दिनेश बागूल यांनी केले.

२७ जिल्ह्यातील ५०५ ज्यूदोपटूंच्या सहभागाने संपन्न होत असलेल्या या स्पर्धेतून महाराष्ट्र राज्याचे संघ निवडले जाणार असून यातील सुवर्णपदक विजेते खेळाडू चेन्नई येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतील अशी माहिती संयोजकांनी दिली.

स्पर्धेच्या आजच्या सामन्यातील निकाल :

मुले –

सबज्युनियर – मुले ३० किलो- सुवर्णपदक-वेदांत मुधोळकर, यवतमाळ, रौप्यपदक-अर्पित इजमुलवार, वर्धा, कांस्यपदक-वंश खरात ठाणे आणि ज्ञानेश पाटील धुळे.

सबज्युनियर – मुले ३५ किलो- सुवर्णपदक- हिमांशू पगारे धुळे, रौप्यपदक-आर्यन शेंडे क्रीडा प्रबोधिनी, कांस्यपदक- अथर्व मुंडे, वर्धा आणि श्रेयश बौचकर, कोल्हापूर

सबज्युनियर – मुले ४० किलो- सुवर्णपदक-अब्राझ खान, मुंबई, रौप्यपदक-भावेश येपारी नागपूर, कांस्यपदक-हिमांशू पाल, वर्धा आणि अथर्व थडके, कोल्हापूर.

सबज्युनियर- मुले ४५ किलो- सुवर्णपदक-हार्दिक खोडके, नाशिक, रौप्यपदक-रुषिकेश घुगे, औरंगाबाद, कांस्यपदक-अमन सिंग, ठाणे आणि कार्तिक परीट, कोल्हापूर

सबज्युनियर- मुले ६० किलो – सुवर्णपदक-संकेत शिंदे, सोलापूर, रौप्यपदक-मित ठाकूर, अमरावती, कांस्यपदक-अथर्व शिंगरे, मुंबई आणि शौर्य पाटोळे, कोल्हापूर.

सबज्युनियर -मुले ६६ किलो -सुवर्णपदक-वीरधवल मते क्रीडा प्रबोधिनी, रौप्यपदक-प्रियांश ठाकूर, मुंबई, कांस्यपदक-हर्ष अडसूळ ठाणे आणि योग हेंमाडे, धुळे.

सबज्युनियर- मुले ६६ किलो – सुवर्णपदक-अक्षज पिल्ले, मुंबई, रौप्यपदक-ओंकार शिंदे, सोलापूर, कांस्यपदक-हर्षवर्धन नागे, औरंगाबाद.

मुली –

सबज्युनियर – मुली २८ किलो – सुवर्णपदक-यशस्विनी जाधव कोल्हापूर, रौप्यपदक- ज्ञानेश्वरी मेश्राम, वर्धा, कांस्यपदक-संचिता माने, सोलापूर आणि साक्षी बोरगावकर, जालना.

सबज्युनियर – मुली ३२ किलो- सुवर्णपदक-वैभवी आहेर, नाशिक, रौप्यपदक-आयेशा शेख, यवतमाळ, कांस्यपदक-तन्वी घाडगे सांगली आणि दिव्या कोळी, कोल्हापूर.

सबज्युनियर – मुली ३६ किलो – सुवर्णपदक-समृद्धी कपिले, यवतमाळ, रौप्यपदक-काजल येरगे, धुळे, कांस्यपदक-भक्ती दुर्बुडे, वर्धा आणि तृषा जाधव, मुंबई.

सबज्युनियर- मुली ४० किलो – सुवर्णपदक-श्रावस्ती पानतावणे, यवतमाळ, रौप्यपदक-दामिनी टोपले, नाशिक, कांस्यपदक-श्रुतकिर्ती खलाटे, औरंगाबाद आणि सोनू देवाडिगा, सांगली.

सबज्युनियर – मुली ४४ किलो- सुवर्णपदक-वैष्णवी मुधोळकर, यवतमाळ, रौप्यपदक-रिया पाटील, औरंगाबाद, कांस्यपदक- मंत्रा पष्टे, ठाणे आणि पूर्वा सोहनी, कोल्हापूर.

सबज्युनियर- मुली ५२ किलो- सुवर्णपदक-कस्तुरी रानमाळे, कोल्हापूर, रौप्यपदक-दिप्ती कदम, सोलापूर, कांस्यपदक-रोशनी वजीफदार, मुंबई आणि खुशिता पवार, सातारा.

सबज्युनियर – मुली ५७ किलो – सुवर्णपदक-अंजली बाभुळकर, क्रीडा प्रबोधिनी, रौप्यपदक-नेहा साहू, मुंबई, कांस्यपदक-रुचिता शेंडे,वर्धा आणि समिक्षा सदावर्ते, कोल्हापूर.

सबज्युनियर- मुली ५७ किलो- सुवर्णपदक-श्वेता गंधावळे, कोल्हापूर, रौप्यपदक- सृष्टी देसले, नाशिक, कांस्यपदक- कीर्ती ए. पुणे आणि नाविन्या रावल, मुंबई.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *