Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशधक्कादायक! ट्रकमध्ये आढळले ४० हून अधिक मृतदेह

धक्कादायक! ट्रकमध्ये आढळले ४० हून अधिक मृतदेह

वॉशिंग्टन । Washington

अमेरिकेतील (America) टेक्सास राज्यातील (Texas state) सण आंटोनीयो शहरात ट्रकच्या आतमध्ये ४० हून अधिक जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या मृत व्यक्तींची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांनी (Police) तपास सुरु केला आहे.

- Advertisement -

याबाबत टेक्सासमधील एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, सण आंटोनीयो (San Antonio) शहरातील दक्षिणेकडे एका रेल्वे (Railway) रुळाच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकमध्ये ४० हून अधिक मृतदेह सापडले आहेत. तर इतर १६ लोकांना वेगवेगळ्या परिस्थितीत जवळच्या रुग्णालयात (hospital) नेण्यात आले. तसेच घटनास्थळी पोलिस, अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत.

दरम्यान, अमेरिकेतील एका पत्रकाराने या घटनेचे काही फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मोठ्या ट्रकच्या बाजूला काही रुग्णवाहिका व पोलिसांच्या गाड्या दिसत आहेत. तसेच एकाच वेळी तब्बल ४० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या