Wednesday, April 24, 2024
Homeधुळेदोंडाईचात 30 लाखांचा गांजा जप्त

दोंडाईचात 30 लाखांचा गांजा जप्त

दोंडाईचा । Dondaicha

नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस उपमहानिरीक्षक पथक व दोंडाईचा पोलीसांच्या पथकाने आज सकाळी संयुक्त कारवाई करून शहरातील 30 लाख 26 हजार 790 रुपयांचा 335 किलो गांजा (cannabis) जप्त केला. या प्रकरणी तीन संशयितांविरुद्ध दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

दोंडाईचा (Dondaicha) येथील मालपूर रोडवरील सदाअप्पा चाळीतील पाण्याच्या टाकीजवळील हर्शल सुरेंद्र पाटील यांच्या निवासस्थानाजवळ छोट्या हत्ती वाहनातून (एम.एच. 16/3352) गांजाची (cannabis) वाहतूक केली जाणार असल्याची गुप्त माहिती विशेष पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाला मिळाली.

या माहितीच्या आधारे विशेष पोलिस उपमहानिरीक्षकाचे पथक व दोंडाईचा (Dondaicha) पोलीसांच्या पथकाने सदाअप्पा चाळीत छापा टाकला. मात्र, पोलिसांच्या छाप्याचा सुगावा लागल्याने तीन संशयितांनी शासकीय कर्तव्यात अडथळा आणला व संशयित वाहन घेऊन फरार झाले. स्थानिक पोलिसांनी या तिन्ही संशयितांमधील निलेश राजू मराठे (रा. शिवराय चौक, दोंडाईचा) याची ओळख पटविली.

यानंतर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी असलेला 336 किलो 31 ग्रॅम गाजा जप्त केला. त्याची किंमत 30 लाख 26 हजार 790 रुपये आहे. निलेश राजू मराठे याच्यासह अन्य दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फरार संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलीस निरीक्षक बापू रोहोम, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन जाधव, सहाय्यक उपनिरीक्षक बशीर तडवी, हवालदार रामचंद्र बोरसे, सचिन धारणकर, पोलिस नाईक प्रमोद मंडलिक, मनोज दुसाने, चालक पोलिस कॉन्स्टेबल सुरेश टोंगारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. टी. लोले, उपनिरीक्षक दिनेश मोरे, हवालदार चंद्रकांत साळुंखे, पोलिस नाईक विश्वेश हजारे, संदीप कदम, कॉन्स्टेबल योगेश पाटील, अनिल धनगर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या