Thursday, April 25, 2024
Homeनाशिकरोजगार मेळाव्यात 126 जणांची प्राथमिक निवड; केटीएचएमच्या मेळाव्यात 293 जागांसाठी 256 उमेदवार

रोजगार मेळाव्यात 126 जणांची प्राथमिक निवड; केटीएचएमच्या मेळाव्यात 293 जागांसाठी 256 उमेदवार

सातपूर । प्रतिनिधी

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मराठा विद्या प्रसारक समाजाच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या प्रांगणात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार व उद्योजकता मेळावा पार पडला. या मेळाव्यात 293 रिक्त पदे उपलब्ध होती. याकरिता 256 उमेदवार उपस्थित होते. त्यातील 126 उमेदवारांची दहा नियुक्त्यांद्वारे प्राथमिक निवड करण्यात आली.

- Advertisement -

याप्रसंगी करिअर टाटा स्टाईव्ह सह्याद्री फार्मचे महेश तकाटे यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेबाबत आणि प्रकाश घुगे यांनी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबवण्यात येणार्‍या मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम (सीएमईजीपी) व इतर योजनांची माहिती दिली.

मेळाव्याचे उद्घाटन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे उपसंचालक सुनील सैंदाणे, केटीएचएम कॉलेजचे प्रा. पवन सुदेवाड, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी संदीप गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी सुनील सैंदाणे व संदीप गायकवाड यांनी प्रबोधन केले. सूत्रसंचालन करून आभार शुभदा पाठक यांनी मानले.

मेळावा यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्रा. पवन सुदेवाड, कौशल्य विकास विभागाचे अधिकारी शंकर जाधव, अख्तर तडवी, सेवक बाळू जाधव, रावसाहेब गावित, महेंद्र महाले, कल्पना दवंगे, सागर भाबड, प्रदीप गावित, अविनाश गायकर व सोनाली शिंदे यांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या