Friday, April 26, 2024
Homeनगरपतंग उडविताना तिसर्‍या मजल्यावरून पडून 22 वर्षीय तरुण गंभीर जखमी

पतंग उडविताना तिसर्‍या मजल्यावरून पडून 22 वर्षीय तरुण गंभीर जखमी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

गच्चीवरुन पतंग (Kite) उडविण्याची हौस तरुणाला (Youth) महागात पडली. पतंग उडवीत असताना तिसर्‍या मजल्यावरून जमिनीवर पडून 22 वर्षीय तरुण गंभीर जखमी (Injured) झाल्याची घटना आज मकर संक्रांतीच्या (Makar Sankrant) दिवशी शहरातील मोरगेवस्ती परिसरात घडली.

- Advertisement -

हनीट्रॅप : व्यापार्‍याचे अश्लिल फोटो व व्हिडीओ
काढून मागितली 30 लाखांची खंडणी

भूषण शरद परदेशी (वय 22) असे या अपघातात जखमी (Injured) झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या डोक्याला, मणक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली असून साखर कामगार दवाखान्यात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला नगर (Ahmednagar) येथे खासगी दवाखान्यात पाठविण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

भाच्याच्या निर्णयावर थोरातांनीच बोलावे; काय म्हणाले खा.डॉ.विखे पाटील वाचा…

मकर संक्रांतीनिमित्त शहरातील विविध ठिकाणी इमारतींच्या गच्चीवर तरूणांनी पतंगबाजीचा आनंद घेतला. अनेक ठिकाणी स्पीकर लावून गाण्यांच्या तालावर पतंग (Kite) उडविण्यात तरुण दंग झाले होते. अशा रितीने पतंग उडवणार्‍या उत्साही तरुणांनी या घटनेतून बोध घ्यावा. पोलिसांनी गच्चीवर स्पीकर लावून पतंग उडवण्याचा आनंद घेणार्‍या नागरिकांवर खबरदारीची उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

वराळ खून प्रकरणात तपास अधिकारी गोत्यात

याबाबत पोलिसांकडे विचारणा केली असता, आम्ही काय करू? ज्या इमारतीवर डीजे लावून पतंग उडवतात, अशा इमारतीखाली उभे राहून आम्ही आव्हान केले, पण लोक ऐकत नाहीत. असे सांगण्यात आले.

जिल्ह्यातील ‘या’ गावातील तलाठी कार्यालय गेल्या चार वर्षापासून बंद

- Advertisment -

ताज्या बातम्या