Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedकोलाबेरी सॉफ्टड्रिंकच्या नावाखाली २१ लाखांचा गंडा

कोलाबेरी सॉफ्टड्रिंकच्या नावाखाली २१ लाखांचा गंडा

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

उन्हाळ्याच्या दिवसात सध्या कोलाबेरी सॉफ्टड्रिंक ((Colaberry soft drink) नावाच्या प्रोडक्टचा मोठ्या प्रमाणावर खप वाढला आहे. व्यवसाय वाढत असल्यामुळे मोठ्या मशिनरींची गरज निर्माण झाली आहे. या मशिनरी खरेदी करण्यासाठी एका व्यक्तीकडून २० लाख ८२ हजार ७५ रुपये आणि दुसऱ्याकडून १० लाख रुपये घेत, मशिनरीची खरेदी केली नाही. त्यामुळे पैसे दिलेल्या व्यक्‍तीच्या तक्रारीवरून तीन जणांविरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

- Advertisement -

धक्कादायक ; आई-वडीलांसह मुलाने केले विषप्राशन

शहरातील मोहंमद साजेदा मोहम्मद इस्माईल, अब्दुल रशीद हुसैन आणि इम्तीयाज फारुखी खान (सर्व मुळ रा. मंगळूर, कर्नाटक, ह.मु.बारी कॉलनी) अशी फसविणाऱ्या तीन भामट्यांची नावे आहेत. मिर्झा मुश्ताक बेग इक्बाल बेग यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याचे झेरॉक्सचे दुकान आहे. त्याठिकाणी येणाऱ्या एका व्यक्‍तीच्या माध्यमातून आरोपी अब्दुल हुसैन याची ओळख झाली. हुसैन याने नारेगाव भागात आकाश गृह उद्योग नावाची कंपनी आहे. त्याद्वारे कोलाबेरी सॉफ्टड्रिंक नावाचे प्रोडक्ट बनविण्यात येते. कंपनीचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे मोठ्या मशनरी खरेदीची गरज आहे. तुम्ही मशिनरी खरेदीसाठी पैसे द्या आणि ५० टक्के नफा मिळवा, असे सांगितले. त्यावर फिर्यादीने हुसैन सोबत कंपनीत जाऊन पाहणी केली. तेव्हा त्याठिकाणी मोहंमद साजेदा व तिचा पती मोहम्मद इम्तियाज फारुखी यांची ओळख झाली. त्यांनीही कंपनीची माहिती दिली. त्यावर विश्‍वास बसल्यामुळे फिर्यादी गुंतवणूक करण्यास तयार झाले. त्यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथील पिनॅकल मशिनरीज कंपनीचे कोटेशनही दाखवले. त्यामुळे मशिनरीसाठी ३५ लाख ८७ हजार २०० रुपये लागणार होते. त्यातील अर्धे १८ लाख रुपये फिर्यादीस मागितले. तेव्हा मिर्झा मुश्ताक नेग यांनी तिघांच्या बँक खात्यात वेगवेगळ्या वेळी २० लाख ८२ हजार ७५ रुपये पाठविले.

मात्र, मशिनरी काही खरेदी करण्यात आलीच नाही. संबंधितांनी दिलेला १८ लाखांचा चेकही बाऊन्स झाला. मोहम्मद इलियास मोहम्मद कासीम (रा. रहीमनगर, अल्तमश कॉलनी) यांनाही तिन्ही आरोपी मशिनरी खरेदीच्या बहाण्याने १० लाख रुपयांना फसविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे बेग यांनी बेगमपुऱ्यात तक्रार नोंदवली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद भालेराव करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या