Wednesday, April 24, 2024
Homeनगरप्रधानमंत्री घरकुलासाठीच्या पात्रता यादीत नेवासा तालुक्यातील १५ हजार ४३८ लाभार्थी

प्रधानमंत्री घरकुलासाठीच्या पात्रता यादीत नेवासा तालुक्यातील १५ हजार ४३८ लाभार्थी

नेवासा (सुखदेव फुलारी)

प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल ‘ड’ यादी सर्व्हे करुन पात्रता यादी तयार झाली आहे. घरकुलाचे सन २०२२ चे लक्ष आले असून त्यात नेवासा तालुक्यात प्रधानमंत्री घरकुलासाठी १५ हजार ४३८ लाभार्थी पात्र ठरले आहेत. पात्रता यादीत लोकसंख्येच्या प्रमाणात सौंदाळा अव्वल ठरले आहे.

- Advertisement -

ड यादीसाठी मोठ्या प्रमाणात जाचक अटी शासनाकडून टाकलेल्या होत्या. अशा अटींमुळे खुप मोठ्या प्रमाणात लाभार्थी वंचित राहिल्याची तक्रार विविध सरपंच संघटनांकडून केली होती. ड यादी सर्व्हे करताना केंद्र सरकारने आधार लिंकींगचा वापर केल्याने वाहनधारक आपोआप रद्द झाले. तसेच किसान क्रेडीट कार्ड लाभधारक देखील वगळण्यात आले. आणि घरातील वस्तू फ्रिज, सायकल देखील या यादीतीतून वगळण्यास कारणीभूत ठरल्याचे शासन आदेशातून समजते. अशा सर्व अटी असूनद `खील प्रधानमंत्री घरकुल पात्र लाभार्थींना यादीतील क्रमवारीनुसार लाभ मिळणार आहे. त्यामुळे शासनाकडून लक्ष्य वाढवण्यात यावे , अशी सरपंच संघटनेने मागणी केली आहे.

नेवासा तालुक्यातील गावनिहाय घरकुल पात्र आकडेवारी

अमळनेर १७१, अंतरवली १२५, बाभूळखेडा ८६, बहिरवाडी ११५, बकुपिंपळगाव ४९, बहऱ्हाणपूर ६४, बेल्हेकरवाडी ९०, बेलपांढरी ६२, बेलपिंपळगाव २८८, भालगाव १०३, भानसहिवरे ४५९, भेंडे बुद्रुक २८४, भेंडा खुर्द ००, चांदा ४४७, चिलेखनवाडी १९४, चिंचबन १०६, देडगाव ३२६, देवगाव २०७, देवसडे ९२, धनगरवाडी १६४, दिघी १६४, फत्तेपूर ७४, गळनिंब ३४, गणेशवाडी ९५, गेवराई ९९, घोडेगाव ३२०, घोगरगाव २०८, गिडेगाव ६२, • गोधेगाव १०७, गोगलगाव १८९, गोमळवाडी ६२, गोंडेगाव ५९, गोणेगाव ६९, गोपाळपूर ६०, हंडीनमगाव १०८, हिंगोणी २४, जैनपूर ९२, जळके बुद्रुक ४८, जळके खुर्द १७३, जायगुडे आखाडा ९०, जेऊर हैबती २१०, कांगोनी १८४, करजगाव १९६, कारेगाव २१, कौठा ५४, खडका ३६, खामगाव १०८, खरखंडी १४८, खेडलेकाजळी २०, खेडले परमानंद ३६, खुणे गाव ३७, खुपटी २१६, कुकाणा ९७, लांडेवाडी २२७, लेकुरवाळे आखाडा २८, लोहारवाडी २३, लोहगाव २४०, महालक्ष्मी हिवरे १२९, माका १०९, मक्तापूर १२०, मळीचिंचोरा ३२८, मांडेगव्हाण ४५, मंगळापूर २५, म्हाळसपिंपळगाव ८९, मोरेचिं चोरे २११, मुकींदपूर ३४१, मुरमे ४१, नागापूर ४९, नजिक चिंचोली २०, नांदूर शिकारी ११९, नारायणवाडी ७४, नवीन चांदगाव ६६, नेवासा बुद्रुक ४०९, निंभारी २८, निपाणी निमगाव १३७, पाचेगाव १९७, पाचुंदे १८२, पानसवाडी २४८, पानेगाव १४१, पाथरवाला १०७, पिचडगाव २५, पिंप्रीशहाली १७०, प्रवरासंगम १६, पुनतगाव ९३, राजेगाव ५९, रामडोह ७३, रांजनगाव ५५, रस्तापूर ६०, सलाबतपूर १३६, शहापूर ११०, शिंगणापूर १०६, शिंगवेतुकाई १५९, शिरसगाव १२०, शिरेगाव १९४, सोनई ७२६, सौंदाळा २७६, सुकळी खुर्द ५४, सु लतानपूर १०४, सुरेगाव (गंगा) ८६, सुरेशनगर ४६, तामसवाडी १०४, तरवडी १९६, तेलकुडगाव २३२, टोका ७७, उस्थळ दुमाला २०८, उस्थळ खालसा १९, वडाळा बहिरोबा २३८, वडुले १३२, वाकडी १४३, वंजारवाडी १५७, वांजोळी २१३, वरखेड २६२, वाटापूर ४३, झापवाडी १०३. नेवासा तालुक्यातील एकूण १५ हजार ४३८ लाभार्थीचा पात्र ठरले आहेत.

प्रधानमंत्री घरकुलासाठीच्या पात्रता यादीत लोकसंख्येच्या प्रमाणात सौंदाळा गाव अव्वल असून पात्र यादीत एकूण २७६ पात्र लाभार्थीचे नावे आहेत. काळजीपूर्वक सर्व्हे करुन ग्रामस्थांना लाभ मिळवून दिला व पात्रता यादीत सर्वाधिक नावे आल्याबद्दल सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक तसेच शिक्षकांचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले आहे.

प्रियंका शरदराव आरगडे, सरपंच

सर्वाधिक घरकुल पात्रता गावे

सोनई ७२६, भानसहिवरे ४५९, चांदा ४५७, नेवासा बुद्रुक ४०९, मुकिंदपूर ३४१, माळीचिंचोरा ३२८, देडगाव ३२६, बेलपिंपळगाव २८८ पात्र झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या