Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याबारावीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात; कॉपीमुक्तीसाठी 'असे' आहे नियोजन

बारावीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात; कॉपीमुक्तीसाठी ‘असे’ आहे नियोजन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) बारावीची परीक्षा मंगळवार दि. 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 या काळात होणार आहे. नाशिक विभागात (Nashik Division) एक लाख 73 हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

- Advertisement -

यंदाची परीक्षा 100 टक्के अभ्यासक्रमावर आधारीत आहे. प्रश्नपत्रिका वेळेवरच मिळणार असली तरी विद्यार्थ्यांना हॉल तिकिटावर (Hall ticket) नमूद वेळेप्रमाणे अर्धा तास आधी उपस्थित रहावे लागणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाने (State Board of Education) दिली आहे. सकाळ सत्रात होणार्‍या परीक्षेची वेळ 10. 30 नोंदवलेली आहे तर दुपारच्या सत्रामध्ये होणार्‍या पेपरसाठी प्रवेश पत्रावर 2.30 वा. ची वेळ आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

पेपरफुटीच्या अफवांमुळे मंडळाच्या प्रतिमेवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे यावर्षीपासून सकाळसत्रात सकाळी 11 वाजता, तसेच दुपारच्या सत्रात 3 वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येणार आहे. त्याबरोबच परीक्षांचे संचलन सुयोग्य प्रकारे होवून त्या परीक्षा केंद्रांवर (Examination Centres) कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.

निवडणूक आयोग बरखास्त करा; उद्धव ठाकरे कडाडले

जिल्ह्यात इयत्ता 12 वी च्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील 108 केंद्रांवर 74 हजार 932, तर इयत्ता 10 वी च्या 203 केंद्रांवर 91 हजार 669 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या लेखी परीक्षा सुरळीत, शांततेत व कॉपीविरहीत पार पडण्याकरिता शिक्षणविभागासह महसूल व जिल्हा परिषदेशी (Revenue and Zilla Parishad) संलग्न असलेल्या इतर विभागांकडून संनियंत्रण करण्यात येणार आहे.

दरम्यान, परीक्षा केंद्रांची अतिसंवेदनशील, संवेदनशील, उपद्रवी व सर्वसाधारण अशी वर्गवारी करण्यात आली असून कॉपीचे प्रकार होणार्‍या परीक्षा केंद्रांवर विशेष पोलिस (Police) बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी (Collector), जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस आयुक्त व पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी व प्रांताधिकारी हे परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रांवर आकस्मितपणे भेटी देणार आहेत.

ठाकरेंना पुन्हा धक्का! विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतला

परीक्षा केंद्रांवर पर्यवेक्षक (Supervisor) म्हणून एकाच शाळेचे अथवा संस्थेचे सर्व शिक्षक त्याच परीक्षा केंद्रावर न नेमता, मुळ शाळेचे काही शिक्षक व इतर शाळांचे काही शिक्षक अशा पद्धतीने पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत.  परीक्षेला आल्यानंतर विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात यणार आहे.

परीक्षेचे गोपनीय साहित्य नेणार्‍या कर्मचार्‍याचे लाईव्ह व जीपीएस लोकेशन (GPS location) घेतले जाणार आहे. परीक्षा कामी नेमण्यात आलेल्या कर्मचार्‍यांच्या व्यतिरिक्त कोणीही अनधिकृत व्यक्ती परीक्षा केंद्रांवर आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. तसेच विद्यार्थी कॉपी करतांना आढळल्यास विद्यार्थ्यावर व या गैरप्रकारात सहभागी व्यक्तीवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे मंडळाकडून नमूद करण्यात आले आहे.

अभिमानास्पद! नाशिकच्या दिग्दर्शकाची शॉर्ट फिल्म ‘इंडियन इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये’

- Advertisment -

ताज्या बातम्या