दहावीतही मुलींची बाजी; यंदा ९५.३० टक्के लागला निकाल

jalgaon-digital
2 Min Read

संगमनेर | वार्ताहर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहेत.राज्य मंडळाचे अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी आज सकाळी 11 वाजता राज्याच्या निकालाची घोषणा केली.

राज्याचा निकाल जाहीर करण्यात आला असून यंदाचा निकाल ९५.३० टक्के लागला असून गतवर्षीच्या तुलनेत १८.२० टक्के अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींचा निकाल अधिक लागला आहे.  विभागीय निकालात कोकणमध्ये सर्वाधिक तर औरंगाबादमध्ये सर्वात कमी निकाल नोंदवला गेला. राज्यातील इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हा निकाल दुपारी एकनंतर ऑनलाइन पाहता येणार आहे.

राज्यात एकूण नऊ विभागांमध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली होती.विभागीय मंडळांकडून ३ मार्च ते २३ मार्च या कालावधीत दहावीची परिक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी १५ लाख ८४ हजार २६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ७५ हजार १०३ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी १५ लाख १ हजार १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विभागीय निकालांमध्ये कोकण विभागाने बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल ९८.७७ टक्के लागला असून सर्वात कमी निकालाची नोंद औरंगाबाद विभागीय मंडळाचे लागला आहे. औरंगाबाद विभाग ९२.० टक्के, पुणे विभागाचा ९२.५० टक्के , यंदाही विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना मागे टाकले. राज्यभरातून ९६.९१ टक्के विद्यार्थिनी तर ९३.९० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांच्या तुलनेत ३.०१ टक्के अधिक विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. ९२.७३ टक्के दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यार्थ्यांना येथे पाहता येईल निकाल

निकाल www.mahresult.nic.in , www.sscresult.mkcl.org आणि www.maharashtraeducation.com या संकेतस्थळावरती विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या संकेतस्थळावरती अर्ज करता येईल. त्यासाठी आधी छायाप्रत घ्यावी लागणार आहे. गुणपडताळणीसाठी ३० जुलै ते ८ ऑगस्ट तर उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतिसाठी ३० जुलै ते १८ ऑगस्ट या कालावधीत अर्ज करता येणार आहे. असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *