Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यादहावी पास होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

दहावी पास होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

नाशिक | प्रतिनिधी

दहावी, बारावीच्या २०२१ परीक्षेसाठी खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन नाव नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे….

- Advertisement -

अनेक विद्यार्थी खासगीरीत्या म्हणजे अर्ज क्रमांक १७ भरून दहावी व बारावीची परीक्षा देतात अशा विद्यार्थ्यांना आता ३० डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना १७ क्रमांकाचा अर्ज भरून परीक्षेसाठी प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानुसार २०२१मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी अर्ज क्रमांक १७ ऑनलाइनपद्धतीने भरण्याच्या प्रक्रियेला ३० डिसेंबरपर्यंत नियमित शुल्कासह मुदतवाढ देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना २९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या महिनाभराच्या कालावधीत ऑनलाइन नावनोंदणी अर्ज व ऑनलाइन शुल्क भरण्याची प्रक्रिया करता येणार आहे. त्याचप्रमाणे ३० नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, ऑनलाइन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोच पावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जमा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

तर ५ जानेवारी २०२१ पर्यंत विद्यार्थ्यांनी जमा केलेले अर्ज संपर्क केंद्र शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाइन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबतची पोचपावतीची छायाप्रत, मूळ कागदपत्र यादीसह विभागीय मंडळाकडे जमा करण्याच्या सूचना राज्य मंडळाने प्रसिद्धपत्रकाद्वारे केल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या