Saturday, April 27, 2024
Homeजळगाव‘१०८’ रुग्णवाहिकेने वाचवले अडीच लाखांहून अधिक रूग्णांचे प्राण!

‘१०८’ रुग्णवाहिकेने वाचवले अडीच लाखांहून अधिक रूग्णांचे प्राण!

जळगाव – jalgaon

रूग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय उपचार (Medical treatment) देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘१०८ रुग्णवाहिके’ (Ambulance) मुळे गेल्या नऊ वर्षांमध्ये जिल्ह्यातील २ लाख ७१ हजार ८७५ नागरिकांचे प्राण वाचले आहेत‌. हृदयविकाराचे रूग्ण, अपघातग्रस्त व्यक्ती ते गर्भवती महिला अशा अनेकांचा यामध्ये समावेश आहे. ५१ हजार ५०३ महिलांना प्रसुतीसाठी रुग्णालयात हलविण्यात यश आले असून १ हजार १९८ बाळांचा जन्म रूग्णवाहिकेत झाला आहे.

- Advertisement -

मुंबई-आग्रा महामार्गावर लक्झरी बस उलटली ; २० प्रवासी जखमी

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ‘१०८’ या आपत्कालीन रूग्णसेवेचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला असून रूग्णांना जलद व तत्पर सेवा देण्याचे काम रूग्णवाहिकांनी करावे. या मोफत सेवेबाबत नागरिकांपर्यंत माहिती पोहचवावी‌. अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, बीव्हीजी इंडिया कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक डॉ.राहूल जैन, जिल्हा समन्वयक आतिष सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमोर ‘१०८’ रूग्णवाहिकेच्या रूग्णसेवेची आकडेवारी सादर करण्यात आली.

रूग्णांना मिळाली संजीवनी

जळगाव जिल्ह्यात २०१४ पासून ते आतापर्यंत अपघातग्रस्त २० हजार ६२५ रूग्ण तसेच हाणामारीचे ४ हजार ४१५ रुग्णांना तर, १ हजार ४५ जळीत रूग्णांना, त्याच प्रमाणे छातीत दुखण्याचे १ हजार ५५८ रुग्ण, उंचावरून पडणे ४ हजार ५२८ रुग्ण, विषबाधा झालेले १२ हजार ६४६ रुग्णांना, इलेक्ट्रिक शॉक लागलेल्या ३२५ रुग्णांना, ७९५ मोठ्या अपघातातील रुग्णांना सेवा दिली आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ३३१ रूग्णांना सेवा मिळाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या