Wednesday, April 24, 2024
Homeधुळेसोन्याच्या बिस्किटांसह सापडले 10 कोटी 73 लाखांचे घबाड

सोन्याच्या बिस्किटांसह सापडले 10 कोटी 73 लाखांचे घबाड

धुळे । Dhule

धुळ्यातील विमा एंजट (Insurance agent) तथा अवैध सावकार राजेंद्र बंब (Rajendra Bomb) याच्या कारनाम्याचे रोज नवनवीन किस्से समोर येत आहेत. आज तपास यंत्रणेने शिरपूर पिपल्स बँकेच्या (Shirpur People’s Bank) लॉकरची झडती घेतली असता सव्वा पाच कोटींच्या रोकडसह सोन्याची बिस्कीटे, एक किलोची लगड, चांदी असे 10 कोटी 73 लाख रुपयांचे घबाड सापडले आहे. आतापर्यंत सुमारे 20 कोटींचा मुद्देमाल हाती लागला आहे.

- Advertisement -

आर्थिक गुन्हे शाखेसह पनकाने आज केलेल्या तपासणीत तब्बल 5 कोटी 13 लाख 44 हजार 530 रुपयांची रोकड, 5 कोटी 54 लाखांचे 10 किलो 563 ग्रॅम सोने. त्यात 67 सोन्याची बिस्कीटे आणि एक किलो सोन्याची लगडचा समावेश आहे. तसेच 5 लाख 14 हजार 918 रूपयांची 7 किलो 621 ग्रॅम चांदी तसेच 12 सौदा पावत्या, 5 मुळ खरेदी खत, 24 कोरे चेक, 50 कोरे स्टॅम्प पेपर सह्या केलेले, बंबच्या जी. पी. फायनान्स कंपनीचे 50 फॉर्म, चेकबुक 1, तीन डायर्‍या, 2 लाँग बुक असा मुुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे जप्त केलेल्या रोकडमध्ये 2 हजारांच्या व पाचशेच्या सर्वाधिक नोटा आहेत. तर 58 युएस, हाँगकाँग, सौदी अरेबिया येथील विदेशी नोटांचा समावेश आहे. पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील यांनी याबाबत आज पत्रकारपरिषदेत ही महिती दिली.

उद्या दि. 4 रोजी राजेंद्र बंब याच्या योगेश्वर पतपेढीतील लॉकरची झडती घेतली जाणार आहे. बंबचे विविध नॅशनलाईज बँकांमध्येही खाते असून त्यांचीही चौकशी केली जाणार आहे. तर आज जप्त केलेल्या तीन डायर्‍यामध्ये राजेंद्र बंब (Rajendra Bomb) याने कोणाला किती कर्ज दिले, त्यांची माहिती असून याबाबत डीडीआर हे चौकशी करतील, असे पोलिस अधिक्षक श्री. पाटील यांनी सांगितले. आर्थिक गुन्हे शाखेचे सपोनि हेमंत बेंडाळे, उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर, कर्मचारी हिरालाल ठाकरे, गयासोद्दीन शेख, भूषण जगताप, रवींद्र शिंपी, मनोज बाविस्कर तसेच उपनिबंधक मनोज चौधरी, राजेंद्र विरकरांंच्या पथकाने ही कारवाई केली.

अवैध सावकारी विरुध्द जनतेने पुढे यावे – बी.जे.शेखर पाटील

शहरासह जिल्ह्यातून अवैध सावकारी हद्दपार करण्यासाठी धुळेकरांनी पुढे यावे, असे आवाहन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जे.शेखर पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केले. तसेच जिल्हा पोलिस दलालाने अवैध सावकारी विरोधात व आतापर्यंत केलेल्या कारवायांबाबत समाधान व्यक्त करत त्यांनी जिल्हा पोलिस दलाची पाठ थोपटली. अवैध सावकारीविरोधात पोलिसांनी कारवाई केल्यानंतर अनेकांच्या तक्रारी येवू लागल्या आहेत. राजेंद्र बंबसह इतर अवैध सावकारीबाबत अजून तक्रारी असतील तर जनतेने पुढे यावे, असेही आवाहन आयजी बी.जे. शेखर यांनी केले.

आक्टोंबरपासून अवैध शस्त्र प्रकरणी जिल्हा पोलिस दलाने कारवायांचा धडाका लावला असून 19 आरोपींना अटक केली आहे. तलवारीचे देखील 8 गुन्हे दाखल केले आहेत. नाशिक परिक्षेत्रामध्ये 145 अवैध पिस्टल,204 जीवंत काडतुसे, 298 तलवारी जप्त केल्या आहेत. एकूण 156 आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विविध गुन्ह्यातील 16 फरार आरोपी, 489 वॉन्टेड आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. तसेच 220 तडीपारांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती देखील यावेळी त्यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या