औरंगाबाद एअरपोर्टच्या विस्तारीकरणाच्या हालचालींना वेग

jalgaon-digital
2 Min Read

औरंगाबाद – aurangabad

औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Airport) विस्तारीकरण करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी तब्बल ५५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. विमानतळ विस्तारीकरणासाठी लागणाऱ्या जमिनीचा आणि खर्चाचा अहवाल नुकताच भूमी अभिलेख विभागाने (Land Records Department) जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय (Collector Astik Kumar Pandey) यांच्याकडे सादर केला असल्याची माहिती भूमी अभिलेख विभागाकडून देण्यात आली.

कीर्तीकरांना म्हातारचळ लागलाय!Visual Story इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बॉलिवूड अभिनेत्री

औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाचे विस्तारीकरण करण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षापासून रेंगाळत पडला आहे. विमानतळाची धावपट्टी १२ हजार फुट लांबीची झाल्यावर विमानतळावर मोठ्या आकारातील विमाने उतरण्याची सोय होणार आहे. त्यासाठी चिकलठाणा येथील ४९.१६ हेक्‍टर, मुर्तीजापूर येथील ४.२५ हेक्‍टर, मुकुंदवाडी येथील २.८४ हेक्‍टर अशी एकूण ५६.२५ हेक्‍टर जागा विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी लागणार आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या कार्यकाळात भूमी अभिलेख विभाग, भूसंपादन विभाग, मनपा, सार्वजनिक बांधकाम विभाग, विमानतळ प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी औरंगाबाद विमानतळ विस्तारीकरणासाठी लागणाऱ्या जवळपास १४७ एकर जागेचे सर्वेक्षण केले होते. परंतु, काही तांत्रिक कारणामुळे विस्तारीकरणाचा प्रश्‍न मागे पडला होता.

 
नुतन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या सूचनेनुसार भूमी अभिलेख विभागाने औरंगाबाद विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी लागणार्‍या जमिनीचा आणि त्यासाठी होणार्‍या खर्चाचा अहवाल नुकताच जिल्हाधिकार्‍यांना सादर केला आहे. त्यामध्ये खासगी मालकाच्या जमिनी वाटाघाटी करून त्याचे भूसंपादन करण्यासाठी ४७५ कोटी रुपयांचा मावेजा द्यावा लागणार आहे. तसेच घरे, फळझाडे, इमारती, विहिरी, बोअरवेल आदीचे अधिग्रहण करण्यासाठी ५० कोटी रुपयांचा मावेजा द्यावा लागणार आहे. त्याचप्रमाणे इतर खर्चासाठी १५ कोटी रुपये असा एकूण ५५० कोटी रुपयांचा अहवाल भूमी अभिलेख विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *