994 प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या

0
 बदली होणारे शिक्षक बदली होणारे शिक्षक अकोले 92, जामखेड 29, कर्जत 24, कोपरगाव 16, नगर मनपा 27, नगर 252, नेवासा 28, पारनेर 135, पाथर्डी 66, राहाता 27, राहुरी 47, संगमनेर 111, श्रीगोंदा 39, श्रीरामपुर 38 यांचा समावेश आहे.
अहमदनगर (प्रतिनिधी) – यंदापासून राज्य सरकारने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी शिक्षक नोकरीत दाखल झाल्यापासून तारखेनुसार जिल्हास्तरावर सेवाज्येष्ठता यादी गृहीत धरण्यात आली आहे. यंदाच्या बदल्यामध्ये संवर्ग 1 ते 4 असे वर्गीकरण करण्यात आले असून वर्ग 1 ते 3 मधील शिक्षकांना त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार रिक्त असणार्‍या 994 जागांवर बदलून जाता येणार आहे.
या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता संवर्ग 4 च्या एक हजार शिक्षकांची बदल्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिक्षकांच्या बदल्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यात संवर्ग 1 मध्ये अपंग, विधवा, परित्यक्ता, मतीमंद मुलाचे पालक, सैनिक पत्नी, दीर्घ आजाराने पीडित, 53 वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांनी बदलीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते.
संवर्ग 2 मध्ये सेवेत असणार्‍या पती 30 किलो मीटरपेक्षा जास्त आंतर असणारे शिक्षक, संवर्ग 3 मध्ये अवघड आणि सोप्या क्षेत्रात बदलीचा अधिकार प्राप्त शिक्षक यांनी त्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार बदलीसाठी 1 ते 20 शाळांची प्राधान्यक्रमाने यादी ऑनलाईन दाखल केली होती. त्यानुसार जिल्ह्यात कार्यरत शिक्षकांमधून राज्य सरकारने 994 शिक्षकांच्या बदल्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
याबाबतच्या याद्या शनिवारी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या आहेत. आता रविवारपासून संवर्ग 1 ते 3 मध्ये बदली होणार्‍या शिक्षकांमुळे विस्तापित झालेल्या 994 शिक्षकांना ऑनलाईन पध्दतीने रिक्त होणार्‍या जागेवर अर्ज दाखल करावा लागणार आहे. त्यामुळे आणखीन एक हजार शिक्षकांच्या बदल्या होणार आहे.
वर्ग 4 मध्ये एकल शिक्षकांचा समावेश असून पूर्वी या शिक्षकांना त्यांच्या पेक्षा कमी सेवा ज्येष्ठा कमी असणार्‍या शिक्षकांना खो देता येत होता. मात्र, शिक्षकांच्या बदल्याचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारने संवर्ग चार मधील शिक्षकांना बदलीसाठी खो देण्याची पध्दत बंद केली आहे. यामुळे या शिक्षकांवर हा एक प्रकारे अन्याय ठरणार आहे.
राज्य सरकारने संवर्ग 1 ते 3 मधील बदली पात्र शिक्षकांच्या बदलीची यादी शिक्षण विभागाला पाठवली असली तरी संबंधीत शिक्षकांना बदलीचे आदेश अद्याप काढलेले नाही. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. ही आचार संहिता संपल्यावर आणि संवर्ग 4 मधील शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शिक्षकांच्या बदल्याची ऑर्डर काढण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

संवर्ग 1 ते 3 मध्ये शिक्षकांच्या सर्वाधिक बदल्या नगर तालुक्यात 252 आणि पारनेर तालुक्यात 135 झाल्या आहेत. या शिक्षकांमध्ये 18 शिक्षक हे उर्दू माध्यमातील आहेत. सर्वात कमी बदल्या कोपरगाव तालुक्यात 16 शिक्षकांच्या होणार आहेत. 

 

LEAVE A REPLY

*