Type to search

Breaking News Featured maharashtra नाशिक मुख्य बातम्या

९३ व्या साहित्य संमेलनाचा मान उस्मानाबादला; नाशिक वंचित

Share

नाशिक | प्रतिनिधी 

९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये होणार आहे. साहित्य महामंडळाच्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा नाशिकला साहित्य संमेलनापासून वंचित राहावे लागणार आहे. आजच्या घोषनेनंतर साहित्याचा वारसा लाभलेल्या नाशिकमधील साहित्यिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पुढील वर्षी म्हणजेच २०२० मध्ये जानेवारी महिन्यात साहित्य संमेलन पार पडेल. गेल्या आठ वर्षांपासून मराठवाडा साहित्य परिषदेच्या शाखेतर्फे मराठवाड्यात साहित्य संमेलन व्हावे याबाबत मागणी केली जात होते, तर पुढील वर्षीचे साहित्य संमेलन नाशिकमध्ये घेण्यात यावे अशीही मागणी होत होती.

९३ व्या संमेलनासाठी बुलढाणा, लातूर, नाशिक आणि उस्मानाबाद अशा चार ठिकाणाहून संमेलनाची मागणी झाली. मात्र त्यामध्ये उस्मानाबादचे पारडे जड ठरले.

मराठवाड्याचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी आणि संतश्रेष्ठ गोरोबाकाकांच्या वास्तव्याने पावन झालेल्या उस्मानाबादमध्ये अखिल भारतीय साहित्यसंमेलन व्हावे यासाठी मराठवाड्याच्या साहित्य परिषदेच्या शाखेने गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला होता.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!