Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

जिल्ह्यात 93 टक्के मतदारांची पडताळणी पूर्ण

Share

नाशिक । प्रतिनिधी

राष्ट्रीय मतदार पडताळणी कार्यक्रमांअंतर्गत गुुरुवार (दि.13) सकाळपर्यंत जिल्ह्यात 93 टक्के पडताळणीचे काम पूर्ण झाले होते. गुरुवारी पडताळणीची अंतिम डेडलाईन होती. दरम्यान, दिवसभराचा अहवाल येणे अद्याप बाकी असून जवळपास 98 टक्के उदिष्ट पूर्ण झालेले असेल असा दावा जिल्हा निवडणूक शाखेकडून करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाच्या सूचनेनूसार देशभरात मतदार पडताळणी कार्यक्रम राबविला जात आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये पडताळणी मोहीम सुरु करण्यात आली. 20 डिेसेबंर 2019 पर्यंत पडताळणीची मुदत देण्यात आली होती. या मुदतीत जिल्ह्यात अवघी 89 हजार मतदारांची पडताळणी झाली ंहोती. त्यामुळे मतदार पडताळणी कार्यक्रमाला 20फेब्रुवारी पर्यत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली होती. जिल्ह्यातील 15 मतदारसंघ मिळून 45 लाख 62 हजार 783 मतदार आहे. बूथ लेवल ऑफिसर (बीएलओ) यांचा कामाचा वेग अतिशय संथ होता.

तर, काही मतदारसंघात बीएलओ कामात दिरंगाई करत होते. हे लक्षात आल्यावर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानूसार कामात कुचराई करणार्‍या बीएलओंवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानूसार काही बीएलओंना गुन्हा का दाखल करु नये, अशा नोटीसा बजाविण्यात आल्यां होत्या. त्यानंतर पडताळणी कामाने वेग घेतला होता.

मागील आठवड्यात जवळपास 79 टक्के पडताळणी पूर्ण झाली होती. 13 फेबु्रवारी ही पडताळणीसाठी डेडलाईन होती. या अवधीत गुरुवार सकाळपर्यंत 93 टक्के मतदार पडताळणी पूर्ण झाल्याचा दावा निवडणूक शाखेने केला आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!