9 इन्क्युबेटर कार्यान्वीत; जिल्हा रूग्णालयात बाल रूग्णांना लाभ

0
नाशिक । जिल्हा रुग्णालयाच्या एसएनसीयु कक्षामध्ये नव्याने दाखल झालेले सर्व 9 इन्क्युबेटर आजपासून कार्यान्वीत करण्यात आले आहेत. यामुळे आता या कक्षात 27 इन्क्युबेटर झाले असून त्याची आवश्यकता असणार्‍या बालक रूग्णांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

इन्क्युबेटरच्या कमतरेमुळे दोन महिन्यापुर्वी जिल्हा रूग्णालयात एका महिन्यात 55 बालके तर पाच महिन्यात 187 नवजात बालके दगावली होती. यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला होता. तर आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंत्रालयात तातडीची बैठक घेत, आढावा घेतला होता.

तर यासह विविध मंत्री, आमदार तसेच विविध पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हारूग्णालयास भेट देत पाहणी केली होती. पालकमंत्र्यांनीही महिन्याच्या आत इन्क्युबेटर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते.

त्यानुसार चार दिवसांपूर्वी दोन कंपन्यांच्या सीएसआरच्या माध्यमातून 9 इन्क्युबेटर उपलब्ध झाले आहेत. तांत्रिक कामकाज पूर्ण होऊन आज सायंकाळी नव्याने आलेले इन्क्युबेटर्स कार्यान्वित करण्यात ओले. सध्या याकक्षात 48 बालके दाखल असून या वाढलेल्या इन्क्युबेटरचा त्यांना लाभ होत आहे.

LEAVE A REPLY

*