Type to search

maharashtra

भीषण अपघातात 9 युवक ठार

Share

पुणे– चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजक ओलांडून ट्रकवर जावून आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात 9 जण ठार झाले आहेत. पुणे-सोलापूर मार्गावर कदम वाक वस्तीजवळ मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास अपघात झाला. मृत महाविद्यालयीन विद्यार्थी यवत येथील रहिवासी होते.

सर्व मित्र रायगड जिल्ह्यात पर्यटनाला गेले होते. परत येत असताना कदम वाक वस्तीजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. कार दुभाजक ओलांडून समोरून येणार्‍या ट्रकवर जावून आदळली. अपघात एवढा भीषण होता की कारचा चेंदामेंदा झाला. त्यात प्रवास करणार्‍या 9 महाविद्यालयीन युवकांचा मृत्यू झाला.

शुभम भिसे, अक्षय घिगे, अक्षय वाईकर, विशाल यादव, निखील वाबळे, दत्ता यादव, जुबेर अजीज, नूर महमद अब्बास दाया, परवेज आश्फाक अत्तार यांचा मृतात समावेश आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!