850 बालवैज्ञानिकांनी बनविली उपकरणे

0
राहुरी विद्यापीठ (वार्ताहर) –जनसेवा प्रतिष्ठानमार्फत महात्मा फुले कृषी विद्यापीठात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सुमारे 850 बाल वैज्ञानिकांनी नावीन्यपूर्ण उपकरणे तयार करून बक्षिसे पटकाविली.
निसर्ग ही सर्वात मोठी प्रयोगशाळा आहे. निर्सगातील छोट्याछोट्या गोष्टीचे निरीक्षण करून सर्व मोठे शोध लागले आहे. हे अनेक उदाहरणाने आयसर, पुणे येथील वरिष्ृठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू यांनी स्पष्ट केले. प्रास्तविक उपक्रम प्रमुख अरुण तूपविहिरे यांनी केले. डॉ. संजय ढोले यांनी सूर्यऊर्जेविषयी विज्ञानकथा सांगितल्या. आनंद बनसोडे यांनी आत्मविश्‍वास ही यशाची सर्वांत मोठी गुरूकिल्ली असल्याचे सांगीतले. कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा यांनी डॉ. सी. व्ही. रामण यांचे संशोधन ‘रामण परिणाम’ विषयी माहिती सांगितली.
पुणे विद्यापीठमार्फत द्रवरूप नायट्रोजनचे प्रयोग दाखविण्यात आले. कार्यक्रमास डॉ. सुनील म्हस्के, दत्तात्रय आरोटे, लक्ष्मीप्रसाद मोहिते, रामचंद्र मंडलिक, सुभाष पोटे, अण्णासाहेब गुंजाळ, बाळासाहेब डोंगरे, सुरेश गव्हाणे, मालती जाधव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. जितेंद्र मेटकर व राजश्री पिंगळे यांनी केले. प्रा. शरद तूपविहिरे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

*