Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

जिल्ह्यातील धरणांमध्ये 84 टक्के जलसाठा; गतवर्षी 42 टक्के साठा : यंदा ‘पाणीबाणी’ टळणार

Share

नाशिक । प्रतिनिधी

गतवर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे फेब्रुवारी महिन्यात देखील जिल्ह्यातील धरणे पाण्याने भरली आहे. आजमितीला 24 धरणांमध्ये 84 टक्के इतका जलसाठा आहे. गतवर्षी हे प्रमाण अवघे 42 टक्के इतके होते. धरणांमध्ये मुबलक पाणी असल्याने पुढील काळात ग्रामीण भागाचे टँकरवरील अवलंबित्व कमी होईल. तसेच, पुढील मार्च ते मे महिन्यात दुष्काळाच्या झळादेखील कमी होणार आहे.
मागील वर्षी जिल्ह्यात जूनमध्ये पावसाने पाठ फिरवली होती. परतीच्या पावसाचे आगमन उशिरा झाल्याने धरणांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये पाणीबाणी निर्माण झाली होती. ग्रामीण भागात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या होत्या.

त्यानंतर मात्र, जुलै ते सप्टेंबर या कालावधीत शंभर टक्क्यांपेक्षा जादा पावसाची नोंद झाली. गोदेसह अनेक महत्त्वाच्या नद्यांंना महापूर आला होता. सर्व प्रमुख धरणे ओव्हर फ्लो झाली होती. तसेच, ऑक्टोबर ते अगदी डिेसेंबरपर्यंत परतीच्या पावसाने राज्यासह जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. नाशिक जिल्ह्यालाही परतीच्या पावसाने अक्षरश: धुवून काढले होते. त्यामुळे सर्व धरणे गतवर्षी शंभर टक्के भरली.

फेब्रुवारी महिना उजाडला असला तरी धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा आहे. आजमितीला गंगापूर धरण समूहात 82 टक्के, पालखेड धरण समूहात 96 टक्के तर, गिरणा धरण समूहात 84 टक्के इतका जलसाठा आहे. त्यामुळे पुढील काळात पिण्याचे पाणी, शेती व उद्योगासाठी आवर्तन देणे सोपे होणार आहे. जिल्ह्यातील 24 धरणांमध्ये एकूण 84 टक्के इतके पाणी आहे. गतवर्षी हेच प्रमाण निम्मे म्हणजे 42 टक्के इतके होते. गतवेळी जानेवारी महिन्यापासूनच दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या होत्या.

ग्रामीण भागात पाण्याचे तीव्र दुर्भिक्ष निर्माण झाले होते. जून महिन्यापर्यंत टँकरची संख्या 424 पर्यंत पोहचली होती. यंदा मात्र, धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने दुष्काळाची दाहकता कमी होईल. पशुसाठी चारा व पाण्याची सहजतेने उपलब्धता होईल. तसेच, गतवर्षी इतके पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार नाही.

गंगापूर धरण समूह

गंगापूर               77
काश्यपी              95
गौतमी गोदावरी   87
आळंदी               73

पालखेड धरण समूह

पालखेड         41
करंजवण       87
वाघाड           66
ओझरखेड      85
पुणेगाव        75
तिसगाव       79
दारणा          86
भावली         96
मुकणे          85
वालदेवी       91                                                                                                                                                                   कडवा         77
नांदूर मध्यमेश्वर  86
भोजापूर              96

गिरणा धरण समूह

चणकापूर         98
हरणबारी          83
केळझर            81
नागासाक्या      94
गिरणा             84
पुनंद               98
माणिकपुंज      92

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!